Milk Rates esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Cow Milk Price: राज्यातील दूध उत्पादकांना सरकारकडून दिलासा, गायीच्या दूधाला मोठी दरवाढ

निश्चित केलेली दरवाढ 21 जुलैपासून होणार लागू

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सरकारने दूधाच्या दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान 34 रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे दूध उत्पादकांकडून स्वागत होत आहे. तर नवीन दर हे 21 जुलैपासून लागू होणार आहेत.(Latest Marathi News)

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला किमान भाव मिळावा यासाठी राज्य शासनाकडून दुग्धव्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने गायीच्या दुधाचा दर 34 रुपये प्रतिलिटर निश्‍चित केला आहे.(Latest Marathi News)

समितीने दिलेल्या शिफारशीनुसार दर देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले की, 'दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.'(Latest Marathi News)

उत्पादन खर्च आणि दुधाला मिळणारा भाव यामध्ये ताळमेळ बसत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. गायींसाठी लागणारा चारा, पशु खाद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली वाढ त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. खर्चाच्या तुलनेत दुधाला किमान 35 ते 40 रुपये भाव मिळावा अशी मागणी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात होती. अखेर त्यांची मागणी मान्य करण्यात आली असून सरकारने दुधाचा दर 34 रुपये प्रतिलिटर निश्‍चित केला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: कर्जमाफी समिती लागली कामाला; चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू यांनी आंदोलनाची घाई करू नये

Power Bank Overuse: पॉवर बॅकचा अतिवापर फोनसाठी घातक, वेळीच काळजी घ्या! अन्यथा फोनची बॅटरी...

Nagpur Accident: नागपुरात रस्ते अपघातांत सर्वाधिक मृत्यू दुचाकीचालकांमुळे; ६९ अपघातांत ७८ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : गिरीश महाजन आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील प्रशासकीय संघर्ष तीव्र

Pune Crime : पुण्यात वाहतूक पोलिसानं गळफास घेऊन संपवलं जीवन; पत्नीनं अनेक वेळा फोन केला, शाळा सुटल्यावर मुलंही घरी परतली, पण..

SCROLL FOR NEXT