Sharad Pawar VS Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar VS Ajit Pawar: शरद पवारांचे टेन्शन वाढलं...तीन शिलेदारांनी सोडली साथ ? आमदारांनी घेतली अजितदादांची भेट

शरद पवार यांच्या गटातील आणखी तीन आमदार कमी होण्याची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. 30 आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार शिवसेना- भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.(Latest Marathi News)

तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या काही आमदारांनी आता अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आमदारांमधील काही दिग्गज आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.(Latest Marathi News)

यामध्ये महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचादेखील समावेश आहे. शरद पवार यांच्या गटातील आमदार सुनील भुसारा आणि आमदार राजेश टोपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. रात्री 9 ते 10 च्या दरम्यान या दोन्ही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.(Latest Marathi News)

शरद पवार यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बोलावलेल्या बैठकीला आमदार सुनील भुसारा आणि आमदार राजेश टोपे उपस्थित होते. आता त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्यामुळे शरद पवार यांच्या आमदारांची संख्या कमी झाली आहे. राष्ट्रवादी पक्षामधील बहुसंख्या आमदारांचा पाठिंबा अजित पवार यांना मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील तब्बल 40 हून अधिक आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी आहेत, अशी माहिती काही नेत्यांनी दिला आहे.(Latest Marathi News)

हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी देखील काल अजित पवारांची भेट घेतली आहे. चेतन तुपेंनी प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे चेतन तुपे हे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाल्याच्या चर्चा आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जीवदान मिळालं, तरी गणित फसलं! विक्रमांचा पाऊस पाडणारा Virat Kohli कसा बाद झाला पाहा... Video Viral

Woman Mountaineer : पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ शिखरावर फडकवला तिरंगा

Latest Marathi News Live Update : केतन अन् सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT