मुंबई : पुण्यातील रघुनाथ कुचिक प्रकरणी महिला आयोगानं मोठं पाऊल उचललं असून शिवाजीनगर पोलिसांना याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पीडित तरुणीनं महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केला होता. आयोगाच्या कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (Big step of women commission in Raghunath Kuchik case Orders given to the police)
राज्य महिला आयोगानं ट्विटद्वारे सांगितलं की, रघुनाथ कुचिक याच्यावर बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप करणाऱ्या तरुणीचा तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला आहे. या तक्रार अर्जातील तपशीलाचा तपास करुन याबाबत योग्य ती कार्यवाही करावी आणि याचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करावा असे आदेश शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना हे आदेश दिले आहेत.
यवत पोलिसांना दिलेल्या आदेशात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, पीडित तरुणीनं आपल्या तक्रार अर्जात आपल्याला तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.