ajit pawar  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : इथेनॉलच्या उत्पादनाबाबत मोठी अपडेट! अमित शहांच्या भेटीनंतर अजित पवारांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

रवींद्र देशमुख

पुणे - इथेनॉल उत्पादनाबाबत मोठी अपडेट आली आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात झालेल्या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण महिती दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, बैठकीत अमित शहांनी सांगितलं की, कारखान्यांना इथेनॉलचे प्लान्ट लावण्यासाठी मदत करायची आहे. तुमचे काही प्रस्ताव असतील तर ते पाठवून द्या. तसेच जे कारखाने अडचणीत आहेत, त्यांना एमसीडीसी मदत करण्यास तयार आहे. परंतु, कागदपत्रांची पूर्तता संचालक मंडळाने किंवा प्रशासकाने केली पाहिजे, असं अमित शहांनी सांगितल्याचं, अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, मध्यंतरी मी शिरूर येथे एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे घोडगंगा काऱखान्याबाबत अडचणी होत्या. त्याबद्दल मी, दिलीप वळसे पाटील आणि साखर आयुक्त यांच्यासह इतर काही सहकाऱ्यांनी बैठक घेतली.

राहुल गांधी यांना दिलासा मिळाला, त्याबद्दल अजित पवार म्हणाले की, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय़ आहे. न्याय व्यवस्थेने न्याय दिलेला आहे. गृहमंत्री अमित शहांनी कौतुक केल्याच्या प्रश्नावर अजित पवारांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न केला. तुम्हाला काय त्रास झाला? यांनी कौतुक केलं, त्यांनी टीका केली, तुम्हाला काय वाटतं, अरे, आम्हाला काय करायचं, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढं म्हणाले, आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर करणारे माणसं आहोत. राज्याचा विकास करण्याकरिता, समस्या सोडवण्याकरता, लोकप्रतिनिधींची कामे होण्याकरिता, मी निर्णय घेतला. मला तरी नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता दिसत नाही. काही जण माझ्यावर टीका करतात. माणसाच्या अनुभवातून वेगवेगळी मतं होऊ शकतात.

परवा पंतप्रधानांनी ५०० रेल्वे स्टेशनसाठी २५ हजार कोटींची तरतूद केली. पहिल्या टप्प्यात १२६ रेल्वेस्टेशन घेतले. त्यात महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानक आहेत, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Latest Marathi News Live Updates: इगतपुरी रेल्वे स्थानकावर आदिवासी सेनेचे संस्थापक दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT