Bihar CM Nitish Kumar government will collapse Ramdas Athawale  nashik
Bihar CM Nitish Kumar government will collapse Ramdas Athawale nashik sakal
महाराष्ट्र

नितीशकुमारांचे सरकार कोसळेल; रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यासोबत होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत आले. आता ते पुन्हा गेले असले, तरीही मोदी यांच्यासोबत पुन्हा येतील, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नितीशकुमार यांचे आमदार फुटतील आणि बिहारचे कोसळेल असा दावा आज केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे नितीशकुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार असे कितीही चेहरे आले, तरीही ते टिकणार नाहीत, असेही ते म्हणाले. सरकारी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, की भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांना संपवतो, हा आरोप चुकीचा आहे.

माझा पक्ष संपवण्यापेक्षा मी पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना भारतीय जनता पक्ष मदत करत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या विभाजनावेळी रा. सू. गवई यांच्याकडे दोन खासदार असल्याने त्यांना उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह मिळाले. पक्ष माझ्या बाजूने असतानाही चिन्ह मिळाले नाही. हा दाखला देत आठवले यांनी निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळेल, असा दावा केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘खरी शिवसेना‘ आणि उद्धव ठाकरेंची ‘बरी शिवसेना‘ असा टोलाही त्यांनी लगावला. मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमच्या पक्षाला एक मंत्रिपद देण्याचा विचार करू, असे त्यांनी सांगितले आहे.

रामदास आठवले म्हणाले...


  • ‘हॅलो‘ या इंग्रजी शब्दाऐवजी ‘वंदे मातरम' म्हणणे चांगले. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चांगली भूमिका मांडली


  • आम्ही पाठिंबा देणारे निवडणूक येतात. मात्र आम्हाला मते मिळत नाहीत. त्यामुळे मते मिळवणारे उमेदवार हे धोरण स्वीकारावे लागेल


  • मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडेल. केंद्रातर्फे सहकार्य केले जाईल


  • भटके-विमुक्तांना हव्या असलेल्या स्वतंत्र आरक्षणाबद्दल लवकर निर्णय अपेक्षित आहे. त्याचवेळी ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळायला हवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT