sakal breaking notifiction esakal
महाराष्ट्र बातम्या

ब्रेकिंग! सोलापुरातील तिघांकडून बिहारी युवकाचा खून; 2 जेरबंद, 1 फरार; मद्यपानावेळी एकमेकांकडे पाहण्यावरून मारहाण

अरिहंत टेक्स्टाईलमध्ये काम करणाऱ्या मुनाकुमार रामधार सिंह (रा. बिहार) याचा मद्यपानावेळी एकमेकांकडे पाहण्यावरून तिघांनी खून केला आहे. जुना कुंभारी नाका येथील हॉटेल बी प्रकाश बारसमोर ही घटना घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली. एक फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : एमआयडीसीतील अरिहंत टेक्स्टाईलमध्ये काम करणाऱ्या मुनाकुमार रामधार सिंह (रा. पोगर, ता. रतीगंज, बिहार) याला मद्यपानावेळी एकमेकांकडे पाहण्यावरून सोलापुरातील तिघांनी जबर मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. जुना कुंभारी नाका परिसरातील हॉटेल बी प्रकाश बारसमोर ही घटना घडली आहे. या प्रकरणी शनिवारी (ता. ८) एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून एकजण फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

ठळक बाबी...

  • - एमआयडीसीतील फॅक्टरीत काम करणाऱ्या मुनाकुमार रामाधार सिंह (वय ४४, रा. पोगर, ता. रतिगंज, बिहार) याचा खून; संशयित तिघांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

  • - अरिहंत टेक्स्टाईल इंडिस्ट्रीज, लोकमंगल हॉस्पिटलजवळ, एमआयडीसी येथे तो मयत तरूण राहायला होता

  • - जुना कुंभारी नाका परिसरातील हॉटेलमध्ये दारू प्यायला गेल्यावर तिघांनी त्याला जबर मारहाण केली

  • - मयताचा येथे कोणीच नातेवाईक नसल्याने अरिहंत टेक्स्टाईलच्या मॅनेजर यांनी दिली पोलिसांत फिर्याद

  • - गंभीर जखमी झालेल्या त्या तरूणाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू; तिघांवर खुनाचा गुन्हा

  • - खुनाची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांची घटनास्थळी भेट

  • - एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी नित्यानंद परमेला (वय २९) व सागर महेश पवार (वय २३) या दोघांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

  • - खुनाच्या गुन्ह्यातील दिगंबर विटकर हा संशयित फरार झाला असून त्याचा शोध पोलिस करीत आहेत.

  • - एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांच्याकडे गुन्ह्याचा तपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT