महाराष्ट्र बातम्या

बॅंक व्यवहारांसाठी "अंगठे छाप' ओळख 

अलताफ कडकाले

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात नवीन "बायोमेट्रिक पेमेंट योजना' सुरू करणार आहेत. याची घोषणा 14 एप्रिल रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी स्वतः मोदी करणार आहेत. त्याद्वारे निरक्षर लोकांना आता बॅंकेच्या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. 

या योजनेत पहिल्यांदाच "बायोमेट्रिक' पद्धतीने बॅंकेतील व्यवहार अंगठ्याच्या ठशाचा वापर करून करता येणार आहेत. या योजनेतून बॅंकेच्या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे; मात्र हे व्यवहार करताना संबंधित व्यक्‍तीचे बॅंक खाते आधार कार्डशी संलग्न असणे अत्यावश्‍यक आहे. केंद्र सरकारच्या "डिजिटल इंडिया' या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी "बायोमेट्रिक पेमेंट' ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे, असे आयडीबीआय बॅंकेचे सोलापुरातील शाखाप्रमुख गुरुराज देशपांडे यांनी सांगितले. 

ते म्हणाले, की अर्थ मंत्रालयाने इतर सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना "बायोमेट्रिक पेमेंट'साठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा एप्रिल 14 पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. 

या महिन्याच्या सुरवातीलाच बायोमेट्रिक पेमेंट योजनेची सुविधा सुरू करणारी खासगी क्षेत्रातील "आयओएफसी' ही देशातील पहिली बॅंक आहे. येत्या दोन आठवड्यांत या सुविधेशी सर्व एटीएम जोडली जातील. 

मागील वर्षी "भीम' ऍप (भारत इंटरफेस फॉर मनी) सुविधेची सुरवात करताना मोदी म्हणाले होते, ""एक वेळ अशी होती की निरक्षर लोकांना "अंगठा छाप' म्हणून उपहासाने हिणवले जात होते; परंतु आता "अंगठा छाप' (अंगठ्याचा ठसा) एखाद्या व्यक्‍तीच्या बॅंकेतील कामांच्या तसेच त्याची स्वतःची ओळख आणि व्यवसायासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या सुविधेसाठी आवश्‍यक असलेल्या "पीओएस' यंत्रांचे दर महिन्याचे भाडे छोट्या व्यापाऱ्यांसाठी कमीत कमी 100 रुपये ठेवण्याची सूचना मोदी सरकारने राज्यातील सर्व बॅंकांना केली आहे. 

ही सुविधा अशी काम करेल 

बोटांचे ठसे, डोळे, चेहरा याद्वारे व्यक्‍तीची ओळख केली जाणार आहे. एटीएम, महत्त्वाच्या ठिकाणी किंवा तत्सम उपकरणे आता पिनऐवजी (पासवर्ड किंवा अन्य कोड) अंगठा, डोळ्यांच्या बाहुलींचे स्कॅन अशा मार्गाने वापरणाऱ्याला "ऑथराइझ' करण्यासाठी बनवली जात आहेत. 

या योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची सोय होणार आहे. शेतकरी, सेवानिवृत्त कर्मचारी व नागरिकांना बॅंकेतील व्यवहार सोपे होणार आहेत. तसेच बॅंकेतील अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे. 
- गुरुराज देशपांडे, आयडीबीआय बॅंक, शाखाप्रमुख 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

NEET 2026 Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी पॅटर्नचे प्रा.शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात, अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात

IPL 2026: पंजाबच्या सलग ६ व्या पराभवानंतर प्रीती झिंटाची स्टेडियममध्येच गंभीर चर्चा; रिकी पाँटिंगचाही चेहरा उतरला

Ahilyanagar Murder Case: अहिल्यानगरमध्ये पुतण्याचा खून करून फरार आरोपीला २४ तासांत अटक; १० लाखांची रोकड जप्त..

Ramdas Athawale: मंत्री आठवलेंकडून पुन्हा शिर्डीतून लढण्याचे संकेत; कार्यकर्त्यांसोबत संवादानंतर व्यक्त केली भावना, 'जनतेचे प्रेम फेडायचे आहे'

SCROLL FOR NEXT