Prakash-Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

"12 आमदारांच्या निलंबन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय असंविधानिक"

सभागृहातील्या कामकाजाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही;प्रकाश आंबेडकर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court)१२ आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंविधानिक आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करत व्हिडिओ शेअर केला आहे.

विधानसभेत गदारोळ आणि विधानसभाध्यक्षांच्या दालनात गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवरील निलंबन कारवाई शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात,सभागृहातील्या कामकाजाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही न्यायालयाला नाही. सभागृह, मग ते पार्लमेंट असो की राज्याची विधानसभा असो, "नेशन विदिन नेशन" या तत्वावर चालते.आमच्या मतानुसार हा निर्णय असंविधानिक असून अधिकारक्षेत्र नसताना दिलेला आहे, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

सभागृहातील लोकांवर निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही. न्यायालयाचा निर्णय सभागृहातील लोकांना लागू होत नाही. महाराष्ट्राची विधानसभा हा निर्णय मान्य करते का, हे आता पाहावे लागेल. असे ही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: रेल्वे प्रवाशांसाठी बातमी! दिवाळीपूर्वी रेल्वेचा मोठा निर्णय; पुणे-हडपसरहून अमरावती, गाझीपूर, गोरखपूरसाठी विशेष गाड्या

अर्थबोध : प्राप्तिकर विभागाला तुमचे उत्पन्न कळू शकते का?

म्युच्युअल फंड : ‘कॉन्ट्रॅरियन इन्व्हेस्टिंग’मधील संधी

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

SCROLL FOR NEXT