Shiv Sena, BJP
Shiv Sena, BJP 
महाराष्ट्र

भाजप-शिवसेना एकत्रच लढणार; अमित शहांचा आदेश

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रच लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी रात्री भेट घेतली, या भेटीत अमित शहांनी हे आदेश दिले आहेत.

या भेटीमध्ये विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शिवसेनेसोबतचे जागावाटप लवकरच पूर्ण करा. राज्यातील दोन्ही नेतृत्वाने चर्चा करून ठरवावे, अशा शहा यांनी फडणवीस यांना केल्याची माहिती मिळत आहे.

शहा आणि फडणवीस यांच्या सुमारे 40 मिनिटे चर्चा झाली. शिवसेनेसोबत जगावापट लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. मात्र, निकालानंतर शिवसेना भाजपसोबत सत्तेत आली होती. यानंतरही दोन्ही पक्षांमध्ये वारंवार वाद झाले. या दोन्ही पक्षातल्या वादाने टोक गाठल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी युती होणार नाही, असे वाटत होतं. पण अमित शहा मातोश्रीवर आले आणि लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय झाला. अद्याप यावर ठोस निर्णय झालेला नसून, दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT