महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेची 'कमळाबाई' टीका भाजपला बोचली; शेलारांचं थेट ठाकरेंना खरमरीत पत्रं

सकाळ डिजिटल टीम

भाजप आणि शिवसेनेतील वाद काही केल्या निवळण्याची चिन्ह दिसत नसून, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहलं आहे. यात त्यांनी भाजपला कमाळाबाई असं उल्लेख करण्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

आपण आमच्या कमळाला कमळाला हिणवायला बाई म्हणताय हरकत नाही. मात्र, बाईमध्ये आई, ताईमध्ये कडक लक्ष्मी पण आहे. त्यामुळे तुमच्यातल्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही पेंग्विनसेना म्हणायचं का? असा प्रश्न शेलारांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सामना वृत्तपत्रात भाजपवर कमळाबाई अशी टीका केल्याने शेलारांनी पत्र लिहित उद्धव ठाकरेंना संतप्त सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही दोन्ही पक्षातील सुरूवात असून अद्याप पिक्चर बाकी असल्याचं बोलल जात आहे.

आज प्रकाशित झालेल्या सामनातील अग्रलेखात सरकारवर विविध मुद्यांवरून टीका करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील बेरोजगारी, जीडीपी, देशावरील आर्थिक संकट आदी मुद्यांवरून भाजपवर टीका करण्यात आली आहे. ही टीका करताना शिवसेनेकडून भाजपला कमळाबाई असं हिणवण्यात आलं आहे. पूर्वीपासून शिवसेनेतील अनेक नेते भाजपला कमळाबाई म्हणून हिणवत आले आहेत. मात्र, आजच्या सामनातील अग्रलेखातील कमळाबाईच्या उल्लेखाला आशिष शेलारांनी उत्तर दिलेलं आहे.

पत्रात नेमकं काय?

शेलारांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आपण आमच्या कमळाला हिणवायला "बाई" म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता "पेग्विन सेना " म्हणायचे का? ता.क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण असल्याचंदेखील शेलारांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दीक वाद वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT