Chandrakant  Patil  on Nitesh Rane
Chandrakant Patil on Nitesh Rane e sakal
महाराष्ट्र

नगरपंचायत निवडणुकीतही भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला - चंद्रकांत पाटील

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात सध्या १०६ नगरपंचायतींसाठी (Nagar Panchayat) झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत जाहीर झालेल्या जागांवर भाजप (BJP) क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीतील (MVA) शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला टोला लगावताना यापुढेही आम्ही तुम्हाला पुरुन उरु असं पाटील यांनी म्हटलं आहे. (BJP became number one party in Maharashtra Nagar Panchayat elections Chandrakant Patil)

पाटील म्हणाले, "आज १०६ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल येत आहेत. यांपै जवळपास ९० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत तर ७ जागांवरील निकाल उद्या लागणार आहेत. पण आत्तापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय की भाजप महाराष्ट्रात नंबरवनचा पक्ष आहे. यामध्ये सदस्यसंख्येमध्ये देखील भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. नगरपंचायती पूर्ण जिंकणं आणि भाजपच्या पाठिंब्यानं जिकणं यामध्ये देखील भाजप पहिल्या क्रमांकावर असल्याचं सिद्ध झालं" वारंवार आम्ही म्हणत आहोत की एकएकटं लढा मग कळेल की कोणाची ताकद जास्त आहे. विचारानं आणि आचारानंही एक नसतानाही तुम्ही युती करुन भाजपाशी लढत देण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या एकत्र लढण्यालाही नजीकच्या काळात आम्ही पुरुन उरु, अशी शब्दांत यावेळी पाटील यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला टोला लगावला.

एकेकटं लढण्यात आम्ही स्वतःला सिद्ध केलं - पाटील

एकेकटं लढण्यात आम्ही हे सिद्ध केलंय की, ओबीसी राजकीय आरक्षण गेल्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या सहा पोटनिवडणुका असतील, ग्रामपंचायतींच्या निवडणुका असतील, विधानपरिषदेच्या निवडणुकीत, पंढरपूरलाही तसेच आजच्या नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्येही आम्ही हे सिद्ध केलंय की भाजपचं महाराष्ट्रातील क्रमांक एकचा पक्ष आहे.

भाजपनं असा मिळवला विजय

साधारण २४ जागांवर भाजपाच्या चिन्हावर स्पष्टपणे विजय मिळवला आहे. सहा नगरपंचायतींमध्ये भाजपाच्या पाठिंब्यानं एखादं-दोन विजय मिळवतील. तसेच ३० पेक्षा जास्त नगरपंचायतींमध्ये स्वतःच्या ताकदीवर विजयी होईल कोणीही मदत न करता. भाजपची सदस्य संख्या तर ४००च्या पुढे जाणारच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT