Nanded Nagar panchayat election Nagar Panchayat Election
महाराष्ट्र बातम्या

नगरपंचायत निवडणूक: भाजप अव्वल, पाहा इतर पक्षांचं बलाबल?

महाविकास आघाडीनं या निवडणुकीत जोर लावला होता

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांच्या ४१३ जागांसाठी मतदान काल मतदान पार पडलं होतं. या जागांचे निकाल आज आणि उद्या जाहीर होत आहेत. यांपैकी आज ९७ जागांचे निकाल हाती आले आहेत. तर उद्या ९ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. ओबीसी आरक्षणाविना या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. महाविकास आघाडीनं या निवडणुकीत जोर लावला होता. (BJP became number one party in Nagar Panchayat elections of Maharashtra)

सध्या पहिल्या टप्प्यातील ९७ जागांवरील सर्व निकाल समोर आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीला ५७ नगरपंचायतींमध्ये विजय झाला आहे तर भाजपला २४ नगरपंचायती मिळाल्या आहेत. तसेच १६ नगरपंचायती इतर पक्षांनी पटकावल्या आहेत. तसेच भाजप (३८४), राष्ट्रवादी (३४४), काँग्रेस (३१६) तर शिवसेनेचे २८४ नगरसेवक निवडून आले आहेत.

दरम्यान, भाजपच या निवडणूकीत सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच भिन्न विचारसरणीचे असतानाही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येऊन लढले तरी त्यांना भाजपनं मात दिली असून येत्या काळतही भाजपविरोधात हे एकत्र लढले तरी आम्ही त्यांना पुरुन उरु असंही त्यांनी म्हटलं आहे.

सन २०१७ आणि २०२२ मधील पक्षीय बलाबल

1) भाजप - ३४४ (२०१७), ४१७ (२०२२)

2) शिवसेना - २०१ (२०१७), २९० (२०२२)

3) काँग्रेस - ४२६ (२०१७), २९९ (२०२२)

4) राष्ट्रवादी - ३३० (२०१७), ३६९ (२०२२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT