Chandrakant Patil statement because of PM Modi people from different social groups get Padma Shri awards  sakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांच्या बाबरी मशीदीच्या वक्तव्यावर भाजपचा सावध पवित्रा

चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा म्हणाले बाबरीबद्दल पाटील यांचे वैयक्‍तिक मत

अंकिता खाणे (Ankita Khane)

अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, त्यात शिवसैनिक नसल्याचे वक्तव्य करून त्यावर सारवासारव करणारे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेपासून भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. ‘पाटील यांनी त्यांचे वैयक्तिक मत मांडले असून, ती पक्षाची भूमिका नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या प्रक्रियेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचा मोठा भाग होता, असेही बावनकुळे यांनी माध्यमांपुढे जाहीर केले. भाजपने आपली भूमिका उघडपणे सांगितल्याने पाटील हे एकाकी पडल्याचे बोलले जात आहे.

बाबरी पाडताना शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिकांबद्दलचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला होता. त्याचे राज्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. त्यावर पाटील यांनीही ‘यू टर्न’ घेतला आहे. पण त्यांच्या विधानांमुळे राजकारण तापण्याच्या शक्यतेने बावनकुळे यांनी ‘ते’ विधान पाटील यांचेच मत असल्याचे सांगितले. अयोध्येत राममंदिर व्हावे, ही साऱ्यांची अपेक्षा होती. त्यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका महत्त्वाची होती, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

बाबरी पाडण्याबाबत उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेवरून उद्धव ठाकरे हे आक्रमक झाले आहेत. त्यानंतर भाजप नेतेही पुढे येऊन ठाकरे यांना लक्ष्य करीत आहेत. ‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व, बाबरी पाडण्यातील त्यांच्या योगदानाबाबत तिळमात्र शंका नसल्याचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले. मात्र, वडिलांच्या नावावर किती वेळ राजकारण करणार, असा सवालही त्यांनी ठाकरे यांना केला. दरेकर यांच्यासह अन्य नेतेही या वादात आल्याने आरोप-प्रत्यारोपांची नवी मालिका सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT