Chandrakant Patil-Sanjay Raut e sakal
महाराष्ट्र बातम्या

''भाजपच्या जीवावर निवडणूक जिंकणाऱ्यांनी दिल्लीची स्वप्न बघू नये''

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचा एक खासदार निवडून आला. त्यानंतर आम्ही दिल्लीच्या राजकारणात जाणार असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) सांगितलं होतं. तसेच आता ममता बॅनर्जीसोबत (Mamata Banerjee) देखील संजय राऊतांची बैठक झाली. त्यावरूनही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

''भाजपच्या जीवावर १८ खासदार निवडून आणणाऱ्यांनी, भाजपच्या जीवावर निवडणूक जिंकणाऱ्यांनी देशाच्या राजकारणात जाण्याची स्वप्न पाहू नये. पळवून आणलेल्या खासदार तुमच्या चिन्हावर निवडून आले का? एका खासदाराच्या जोरावर म्हणतात आम्ही देशाच्या राजकारणात जाणार. त्यासाठी देशभर फिरावं लागतं. ते करण्याची यांची तयारी नाही. उद्धव ठाकरे मातोश्रीमधून कधी बाहेर पडत नाहीत. गेल्या दोन वर्षात एकदाही उद्धवजी मंत्रालयात गेले नाहीत'', असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काही दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर संजय राऊतांनी ममता या बंगालच्या वाघिण आहेत, असं म्हटलं होतं. त्यावरूनही चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ''संजय राऊत एक नंबरचे डबलढोलकी आहेत. मुंबईमध्ये ममता बॅनर्जींच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधींच्या सुरात सुर मिसळतात. ते खुर्ची टिकविण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. आता ममतांच्या युपीएबद्दलच्या वक्तव्यामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी डोळे वटारले असतील'', असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT