bjp chandrashekhar bawankule on ajit pawar over allegation on shinde fadanvis government maharashtra politics
bjp chandrashekhar bawankule on ajit pawar over allegation on shinde fadanvis government maharashtra politics  esakal
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांना बोलण्याचा काही अधिकार नाही; मंत्र्यांच्या सुरक्षेवरून भाजपचे प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्र्यांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच गाजत आहे, दरम्यान आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यावरून सरकारला धारेवर धरलं, दरम्यान भाजपकडून अजित पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ आहेत, त्याच्या पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेते असल्याचे दाखविण्यासाठी ते काही तरी आरोप करत आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केलेल्या आरोपांविषयी प्रतिक्रिया विचारली असता बावनकुळे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. ते कधीही सत्तेचा दुरुपयोग करत नाहीत. त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारने गुंडाराज संपविले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र बलात्काऱ्याला संरक्षण देण्यात आले, गृहमंत्र्याला तुरुंगात जावे लागले, मंत्र्याच्या बगलबच्च्यांना पोलीस सुरक्षा दिली, राज्यातील पोलिसांचे खच्चीकरण करण्यात आले, चांगल्या अधिकाऱ्यांना बाजूला केले, यामुळे अजित पवार यांना बोलण्याचा काही अधिकार नाही.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्ता गेल्यानंतर त्या पक्षात अस्वस्थता आहे. सत्तेसाठी अजित पवार यानी केलेली खेळी योग्य होती की शरद पवार याची चाल बरोबर होती यावरून त्या पक्षात संघर्ष चालू आहे. महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे. त्या पक्षातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशा अस्वस्थतेतून अजित पवार माध्यमांमध्ये जागा मिळविण्यासाठी आरोप करत आहेत.

अजित पावर काय म्हणाले...

मंत्र्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यावरून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला झापलं, ते म्हणाले की, आता किती लोकांना वाय प्लस सुरक्षा आहे, खरंच त्यांना गरज आहे का? माजी नगरसेवक असून देखील त्यांच्यासोबत दोन पोलिस असतात आणि जर त्यांने काही गंभीर चुका केल्या असतील तर तो त्याचं निस्तारेल असे त्यांनी म्हटलं. शिंदे फडणवीस सरकारच्या काळात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सुरक्षा काढण्यात आल्या होत्या आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली त्यावरुन देखील वाद निर्माण झाला होता.

राज्यातील किती नेत्यांना ही सुरक्षा

राज्यात मुख्यमंत्री आणि आठ मंत्री वगळता शिंदे गटाच्या ३१ आमदारांना अशा प्रकारची सुरक्षा देण्यात आली आहे. ही सुरक्षा वाय दर्जाची असून सोबत एस्कॉर्ट देखील देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT