Ajit Pawar Vs Chandrashekhar Bawankule 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजितदादांमध्ये हिम्मत असेल असं वाटलं होतं, पण..; बावनकुळेंनी पुन्हा डिवचलं

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar Vs Chandrashekhar Bawankul : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील वाद मागच्या काही दिवसांपासून पेटला आहे. बावनकुळे यांनी बारामती दौरा करत तेथे राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडणार असल्याचे घोषणा केल्यानंतर अजित पवारांनी विधानसभेत बावनकुळेंवर निषाणा साधला होता.

काही महिन्यांपूर्वी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीतलं राष्ट्रवादीतलं घड्याळ बंद करण्याचा इशारा दिला होता. यावर विधानसभा अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बावनकुळे यांना मनात आणलं तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा दिला. यानंतर आता बावनकुळे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांना डिवचलं आहे.

बावनकुळे काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना भाजप नेते बावनकुळे म्हणाले की, अजित दादांमध्ये फार हिम्मत आहे असं वाटलं होतं, लढवय्ये आहेत असं वाटलं. पण माझ्या एका दौऱ्यामध्ये त्यांच्यामध्ये इतका फरक पडला. माझ्या एका दौऱ्याने अजित पवार यांना इतकी भीती वाटत आहे की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत.

अजित पवार यांच्यात एवढी हिम्मत नाही अजून की ते आमचा करेक्ट कार्यक्रम करू शकतील. ते जनता ठरवते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत युती असून देखील राष्ट्रवादी कधी ७५ च्या वर गेली नाही, ते काय करेक्ट कार्यक्रम करतील, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

अजित पवार काय म्हणाल होते?

अजित पवार म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात सरकार (शिंदे-फडणवीस सरकार) आल्यानंतर आपले एक नेते माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा वल्गना करतात. आता आमतं तिथं काम आहे, खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का?"

"जर मी मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, महाराष्ट्राला माहिती आहे मी एखाद्याला चॅलेंज दिल की मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही, हे पण खरं आहे. त्यांना म्हणावं जरा दमानं. फार फास्ट गाडी चालली, फास्ट गाडीचा कधी अपघात होईल आणि कोलमडून पडाल सांगता येणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT