Chitra Wagh sakal
महाराष्ट्र बातम्या

'शिवसनेचं उपऱ्यांच्या मदतीने सरकार, १०० कोटींच्या वसुलीवर शिक्कामोर्तब'

सकाळ डिजिटल टीम

चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, शिवसेनेनं उपऱ्यांच्या मदतीनंच हे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलंय.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर आता भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज बाळासाहेबांसारख्या ताठ कण्याच्या नेत्याची कमतरता जाणवतेय असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसंच भाजपवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तरही दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी उपरे उमेदवार घेतात आणि म्हणे जगातला सर्वात मोठा पक्ष असं म्हणत भाजपवर टीका केली होती. त्यावर चित्रा वाघ यांनी म्हटलं की, उपऱ्याचं महत्त्व माननीय मुख्यमंत्र्यांना चांगलंच माहित आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, शिवसेनेनं उपऱ्यांच्या मदतीनंच हे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलंय. झोळी घेतलेला ‘फकीर’ नसल्याचं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री बोलताहेत हे खरंय. यामुळे १०० कोटींच्या वसूलीवर शिक्कामोर्तब झाल्याचाही टोला त्यांनी लगावला.

'मी वचन पाळण्यासाठी मुख्यमंत्री झालो. त्यांनी शब्द पाळला असता आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असतं तर कदाचित मी राजकारणातून बाजुला झालो असतो. मै फकीर हू... झोली फैला के बैठा हू, असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाषणातून दिले होते.

संजय राठोड, महेबूब शेख, निलेश लंके, हे सरकारचे जावई अद्याप गजाआड का गेले नाहीत असा सवाल करताना चित्रा वाघ म्हणाल्या की, महिला अत्याचाराचा मळा फुलवण्याचं काम सरकारचेच मंत्री करताहेत अन् मुख्यमंत्र्यांचं ‘नाचता येईना असं सुरूय. ही तर विचारांची दिवाळखोरी असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT