bjp chitra wagh share supriya sule video about her journalist wearing sari statement rak94 
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule News: या नेत्यांना सोलणार का? सुप्रिया सुळेंच्या 'त्या' व्हिडिओवर चित्रा वाघ यांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शिवप्रतिष्ठानचे संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला टिकली लाव मग तुझ्याशी बोलतो असं म्हटल्याने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती, त्यानंतर आता हा टिकलीचा वाद साडीपर्यंत पोहचल्याचे पाहायला मिळाले आहे. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी साडी नेसण्यावरून केलेल्या विधानाचा व्हिडिओ शेअर करत हल्ला चढवला आहे.

या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे म्हणतायात की, 'मला खूप वेळा गंमत वाटते, चॅनलमधल्या मुली साडी का नाही हो नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय', हा व्हिडिओ चित्रा वाघ यांनी ट्विट केला आहे.

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट केलं आहे आणि सोबत म्हटलं आहे की, 'टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या!'. चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आता टिकलीपाठोपाठ साडीवरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंना बीडमध्येच एवढा पाठिंबा का मिळतो? गेवराईत मराठा समाजातल्या मुलींबद्दल आक्षेपार्ह विधान

Sanjay Raut : नाशिक दत्तक घेतले मग समस्या का सुटत नाहीत? संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Medicine MRP Change: औषधं आणि वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार! केंद्र सरकारचा नवा आदेश लागू, अंमलबजावणी कधी करणार?

Bala Nandgaonkar : "राज ठाकरेंनी केलेली कामे तरी टिकवा!" बाळा नांदगावकरांचा भाजपला टोला

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

SCROLL FOR NEXT