महाराष्ट्र बातम्या

BJP on SC : भाजपची सुप्रीम कोर्टावर टीका! मणिपूर घटनेवरुन केंद्राची खरडपट्टी काढल्यानं आमदाराचा संताप

मणिपूरमधील कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्यानं सुप्रीम कोर्टाला सुओमोटो दाखल करुन घेणं भाग पडलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर सुप्रीम कोर्टानं केंद्रावर ताशेरे ओढत काहीतरी करा अन्यथा आम्हालाच पावलं उचलावी लागलीत, अशा शब्दांत इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सुप्रीम कोर्टावर टीका केली आहे. (BJP criticized Supreme Court Atul Bhatkhalkar angry because SC cognizance on Manipur Violence)

भातखळकर यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं केलेल्या टिप्पणीची बातमी रिट्विट करत सुप्रीम कोर्टावर टीका केली आहे. सरकारचं काम सुप्रीम कोर्ट करणार असेल तर सुप्रीम कोर्टानंच देश चालवावा. मग कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल, अशा शब्दांत भातखळकरांनी सुप्रीम कोर्टाला टार्गेट केलं आहे. (Latest Marathi News)

सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं होतं?

मणिपूरमध्ये गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून दोन समजांमध्ये जातीय हिंसाचार सुरु आहे. त्यातच गुरुवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. त्यानुसार, दोन महिलांचा विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं देशभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या.

मणिपूरमधील ही सर्वात टोकाची परिस्थिती समोर आल्यानं तीथं कायदा सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारही अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं अखेर सुप्रीम कोर्टानं सुओमोटो दाखल करुन घेत सीजेआय चंद्रचूड, न्या. नरसिम्हा आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.

सरन्यायाधीशांनी म्हटलं की, मला वाटतं आता वेळ आली आहे की सरकारनं खरोखर पुढे यावं आणि कारवाई करावी, कारण हे सर्वस्वी अमान्य आहे. आम्ही सरकारला कारवाईसाठी थोडा वेळ देऊ पण यानतंरही ग्राऊंड लेव्हलवर काही कार्यवाही झाली नाही तर मग आम्हाला कारवाई करावी लागेल"

PM मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं ज्या दिवशी केंद्राला हा इशारा दिला त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा संसद भवनाबाहेर माध्यम प्रतिनिधींसमोर मणिपूरमधील परिस्थितीवर भाष्य केलं. आम्हाला याचं आतिव दुःख आणि चीड वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं.

तसेच राजस्थान, छत्तीसगड आणि मणिपूर सारख्या घटनांमधील आरोपींना सोडणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं त्यांनी म्हटलं. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT