bjp devendra fadanvis on shivsena sanjay raut allegations after ed raid  टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

"नखं कापून शहीद.."; संजय राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडी (ED) ने कारवाई केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या दरम्यान काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करतात, लोकांचे लक्ष वेधण्यासाठी काही लोक बोलत असतात असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

मराठी माणसाच्या नावावर राज्य करायचे आणि मराठी माणसांनाच लुटायचे, हे आता चालणार नाही. कायदेशीर उत्तर देण्याऐवजी भावनात्मक उत्तरं देत बसण्यात अर्थ नसतो अशी टिका त्यांनी यावेळी केली. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आमच्या अनेक नेत्यांच्या घरामध्ये माणसे घुसवून त्यांची मापं घेऊन, नसलेल्या नोटीसा दिल्या, आम्ही कायद्याने मुकाबला करण्याची भुमिका घेतली. जे काही पुरावे आहेत त्याच्या आधारे नोटीस दिली असून कायदेशीर नोटीस मिळाली असताना कायद्याने उत्तर दिलं पाहिजे. भावनिक उत्तर दिल्याणे त्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

पत्रावळा चाळ ही गरीब मराठी माणसांचा प्रश्न होता, तो भीजत पडला कारण ज्यांनी स्वतःला त्यांचा मसिहा घोषित केला होतं त्यां लोकांनीच त्यांचे इंटरेस्ट कॉम्प्रमाइज केले आणि बिल्डरांच्या घशामध्ये हे टाकलं. असं ते म्हणाले फडणवीसांनी पुढे मुख्यमंत्री असताना या संबंधीच्या एफआयआर आणि म्हाडानं याचं बांधकाम करावं हे निर्णय मी घेतले असे देखील सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसाला लुटायचं हा धंदा मुंबईत कोण करतंय हे आता स्पष्ट होत आहे.

यादरम्यान आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेला निधीच्या घोटाळ्याचा मुद्दा शिवसेना खासदार संजय राऊतयांनी बाहेर काढला आहे. विक्रांतसाठी गोळा केलेल्या निधीच्या घोटाळ्या संदर्भात त्यांनी भाजपाचे किरीटी सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, संजय राऊतांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेले आरोप हास्यास्पद असल्याचं फडणवीस म्हणाले. ते कोणत्याच आरोपाचा पुराव देऊ शकले नाहीत. राज्य सरकारकडून सोमय्या आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की चुकीची कारवाई करता येणार नाही, असेही ते म्हणाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभे राहिले अन्‌ तिघांच्या आयुष्य क्षणात संपले... एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Astronomical Events 2026: नववर्षात ४ सुपरमून, २ ब्लूमून व १२ उल्कावर्षाव; देशवासीयांना विविध खगोलीय घटनांची मिळणार पर्वणी

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT