Devendra Fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : माझं काम नाईट वॉचमनचं...; मोदी @९मध्ये फडणवीसांची फटकेबाजी

सकाळ डिजिटल टीम

भारताचा मान जगात वाढला आहे, इजिप्तलाही मोदींनी आपल्या जवळ घेतलं आहे. आतंराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रेटिंग नंबर एकवर आहे. राहुल गांधीनी भारतात लोकशाही नाही हे परदेशात सांगितले. पण अमेरिका सारख्या देशांनी सांगितले की भारतात लोकशाही आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'मेरा बुथ, सबसे मजबुत’ या कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस या कार्यक्रात पुढे बोलताना म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या विस्तारातून संधी तयार होतात, रोजगार तयार होतात. गरीब कल्याणाच्या अजेंड्याकरिता पैसा येतो. जी-जी विकास काम चालू आहेत तो पैसा आला कठुन, हा पैसा आपणच अर्थव्यवस्थेला चालना देऊन वाढवला आहे.

आज २५ कोटी जे बेघर होते अश्या लोकांना घर मिळाले. सर्व योजनांचा एकत्रित इफेक्ट काय आहे , भारतात जी अतिगरीबी होती ती आता १ टक्क्यांपेक्षा पण खाली गेली आहे. ज्या देशला जगात गरीब देश म्हणून पाहिलं जायचं आज त्या देशाची आर्थिक परिस्थिती बदलत आहे. जग थक्क आहे. आपण ११ ववरून ५ वर का आलो. आज आपण जीडीपीची ग्रोथ करतोय, आज जगाचं लक्ष भारताकडे आहे. संपूर्ण जगात मंदी आहे पण भारत हा जगात वेगाने वाढाणारी अर्थव्यवस्था आहे, असेही फडणवीस म्हणाले.

आपल्या शेतकऱ्यांवर एक रुपयांचा बोजा दिला नाही. पाकिस्तान मध्ये २५० वर पेट्रोल गेलं. पण भारताना मुस्सद्देगिरी करुन ती किंमत २००-२५० जाऊ नये अशी व्यवस्था उभी केली. प्रत्येक बाबतीत जी मोदींनी व्यवस्था उभी केल्या आहे. आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाहीय जग आपल्याला अडवत नाही पण आपल्याला आपल्या देशातले विरोधकच अडवत आहेत.

मोदी @९ हा एक अतिशय अभिनव उपक्रम आपन सर्वांनी चालवला आहे ..१० लाख बूथ प्रमुख यांच्याशी सवांद साधण्याचा आज रेकॉर्ड होणार आहे. तुम्ही दिलेल्या मताच्या कर्जाचे आम्ही कशा प्रकारे बहुमूल्य मध्ये रुपांतर केले आहे . वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून आम्ही काम केले आहे .

मोदी यांच्या सारखा नेता आम्हाला मिळाला आहे . आताचा मोदीजी यांची अमेरिका भेट झाली आहे . त्यांच्या संसद भवनात गेले तेव्हा आपल्या पेक्षा आधिक त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे, हा त्यांचा व्यक्तिगत सन्मान नसून भारत देशाचा सन्मान आहे, असे फडणवीस म्हणाले.

पूर्वी आपण GDP ग्रोथ नंबर सांगायचो, आज जास्त लोकांच्या सहभागातून आपण GDP ग्रोथ करत आहोत. जगात मंदी असताना भारत सर्वात अधिक वाढणारी अर्थव्यवस्था आहे . युक्रेन - रशिया यामध्ये युद्ध असताना जगातील लोक म्हणत होते की युरिया किंवा गहू यांचे भाव वाढतील. जगामध्ये खताच्या किमती चार पटीने वाढलाय पण, आपल्या देशात या किमती वाढल्या नाहीत.

पेट्रोल डिझेल किंमतींवर बोलताना फडणवीस म्हणाले की, पाकिस्तान मध्ये २५० रुपये लिटर दर झाले आहेत मात्र, मोदीनी जी व्यवथा उभा केली आहे त्यामुळे, आपले दर वाढले नाहीत .. आपली अर्थव्यव्था ऑटो पायलट मोड वर आली आहे. त्यामुळे काही विरोधक याला खील बसवत आहेत. खरं, म्हणजे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक नेता म्हणून मोदींना मान्य केली आहे, असे फडणवीस म्हणाले.

अमेरिकेतील व्हाइट हाऊसमध्ये सांगितले गेले की या ठीकणी लोकशाही केवळ नांदत नाही तर, समृद्ध होते. आज जगात ५ नंबर वर आपली अर्थव्यव्था आहे .. या मध्यामातून संधी आणि रोजगार निर्माण होतो .. त्यामुळे पुढच्या काही दिवसात ३ नंबर वर आपली अर्थव्यवस्था येईल,

जेव्हा जळजीवन मिशन या योजेअंतर्गत जास्त पैसे खर्च होतो तेव्हा, त्याचा एकत्रित गरिबी नष्ट होते. त्यामुळे भारताची अती गरिबी १ टक्के पेक्षा खाली गेली आहे . आज मोदीजी बूथ पर्यंत सवांद करणार आहेत. सगळ्या नेत्यांनी घर चलो अभियान या मध्ये सहभागी झाले पाहिजे. मी माझ्या मतदार संघात प्रमुख १५ लोकांच्या घरी जाऊन आलो आहे

त्यामुळे, मी करू शकतो तर, आपल्या सर्व लोकांनी केले पाहिजे . त्यामुळे, हे केल्यावर लोकांचे अधिक मोदी बद्दल सवांद साधणार आहेत . त्यामुळे आता लवकरच मोदी या ठिकाणी संवाद साधणार आहेत. माझं काम नाईट वॉचमनच होतं असेही फडणवीसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT