Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या बिघडलेल्या राजकीय संस्कृतीमागचे भीष्म पितामह म्हणजे उद्धव ठाकरे

कार्यकर्त्यांनी जी वैयक्तिक खालची पातळी गाठली ती पातळी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलाटणी देणारी ठरली.

दत्ता लवांडे

मुंबई : "महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जी वैयक्तिक खालची पातळी गाठली ती पातळी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलाटणी देणारी ठरली. मग यामागचे भीष्म पितामह कुणाला म्हणता येईल, तर ते आहेत उद्धव ठाकरे" असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीसांना बोचरी टीका केली आहे. "आम्ही सरकार चालवलं. अर्ध्या रात्री उध्दवजींनी कॉल केला तरी त्यांच्या सगळ्या गोष्टींचा मान राखला. त्यांना कधीच नाही म्हटलो नाही. मान अपमानाच्या गोष्टी न करता मी स्वत: मातोश्रीवर जायचो. तरीपण त्यांनी आमच्याशी युती तोडली" असं ते या कार्यक्रमात म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी काल आपल्या सभेत "आत्तापर्यंताच सर्वांत कलंकीत मुख्यमंत्री" म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं असून "माझे वडील आणि माझा कॅमेरा हेच उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व अशा शब्दांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : कॅनडामध्ये विमान अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT