Maharashtra Rajya Sabha Election esakal
महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांच्या डोक्यात संख्याबळाचं गणित असल्याशिवाय..; विजयानंतर महाडिकांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

विजयानंतर धनजंय महाडिक यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिलीय.

Maharashtra Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेनेचे (Shiv Sena) उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे (Congress) उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. तर, भाजपचे (BJP) उमेदवार अनिल बोंडे, पीयूष गोयल आणि धनंजय महाडिक हे ही विजयी झाले आहेत.

मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर, शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 32, तर भापजचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 25 मतं मिळाली. त्यानंतर संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात आता चुरशीची लढत निर्माण झाली होती. पण, दुसऱ्या पसंतीची मतं महाडिक यांना जास्त मिळाल्यानं त्यांचा विजय झालाय.

दरम्यान, विजयानंतर धनजंय महाडिक (Dhanjanya Mahadik) यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिलीय. भाजपचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब (Devendra Fadnavis), चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या कष्टामुळं, रणनितीमुळं भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. कोणतीही निवडणूक असली की, टेन्शन हे असतंच. ज्या दिवशी अर्ज भरला, तेव्हाच सांगितलं होतं की, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. कारण, फडणवीस साहेबांच्या डोक्यात संख्याबळाचं गणित असल्याशिवाय माझं नावच घोषित झालं नसतं, असं त्यांनी म्हटलंय.

भाजपनं ज्या पद्धतीनं माझं नाव घोषित केलं. जे गणित आखलं, जी रणनिती आखली, त्यामुळं आम्ही या निवडणुकीत यश संपादिक करु शकतो, याचा मला आनंद आहे. या निवडणुकीत माझा फक्त मुलगाच नाही, तर माझे सगळे भाऊ, माझी मुलं, माझी पत्नी, मित्र परिवार, मुंबईत ठाण मांडून आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विजयानंतर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

विजयानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे की, महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. पियुष गोयल यांना सर्वाधिक 48 मतं, अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली आहेत. आमचा तिसरा उमेदवारही शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन निवडणून आलाय. आज भाजपची ताकद बघायला मिळाली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT