महाराष्ट्र बातम्या

Loksabha 2019 : बारामतीवर भाजपचे लक्ष केंद्रित

सकाळवृत्तसेवा

बारामती शहर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघातील समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगितले गेले.

चंद्रकांत पाटील बारामतीत दर दोन दिवसांनी येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच प्रचाराची व्यूहरचनादेखील करणार आहेत. ३ एप्रिल रोजी बारामतीत भाजप व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली.

मोदींच्या सभेसाठी तयारी
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपच्या कमळ या चिन्हावर लढणाऱ्या अधिकृत उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी १० किंवा ११ एप्रिल रोजी बारामतीत सभा घेणार आहेत. मोदी यांची बारामतीतील सभा जंगी व्हावी, या दृष्टीने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आजपासूनच तयारी सुरू झाली आहे. बारामतीच्या सभेला एक लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित राहावा, या दृष्टीने बारामतीत नियोजन सुरू झाले आहे. बारामतीची सभा ही भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असून, शरद पवार व सुप्रिया सुळे यांना थेट शह देण्याच्या रणनीतीचा हा एक भाग समजला जात आहे.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत नेमके काय बोलणार, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत देखील नरेंद्र मोदी यांनी बारामतीत सभा घेऊन ‘काका- पुतण्याची राज्य उलथवून टाका’ अशी हाक दिली होती. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. उलट अजित पवार हे विक्रमी मतांनी विजयी झाले. पंतप्रधानांच्या बारामतीच्या सभेचा नेमका काय परिणाम साधला जाणार, याबाबतही उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT