bjp girish mahajan 
महाराष्ट्र बातम्या

...म्हणून मला त्या लग्नाला जावं लागलं; गिरीश महाजन यांचे 'दाऊद' संबंधाच्या आरोपावर उत्तर

विधान भवनात भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. त्यानंतर महाजन यांनी पत्रकारांसमोर यावरुन प्रतिक्रिया दिली आहे.

कार्तिक पुजारी

नागपूर- विधान भवनात भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरुन विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. त्यानंतर महाजन यांनी पत्रकारांसमोर यावरुन प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे ते काहीही आरोप करत सुटलेत. मी ज्यांच्या लग्नाला गेलो होतो त्यांचा दाऊदशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, असं ते म्हणाले.

खडसे यांनी जो फोटो दाखवला आहे. तो २०१५-१६ मधील आहे. तेव्हा नाशिक शहरातील धार्मिक गुरु शहर ऐ खातीम हे उच्च पदावर होते. त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं. त्यावेळी २० ते २५ हजार लोक होते. सर्व पक्षाचे राजकीय लोक, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती त्याठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे मलाही त्या ठिकाही जावं लागलं. कारण, त्यांनी कुंभमेळाव्यासाठी खूप मोठी मदत केली होती. त्यामुळे आम्ही जाण्याचं ठरवलं होतं. त्यावेळी सर्व पक्षाचे नेते पार्टीमध्ये होते, असं ते म्हणाले.

पार्टीतील एक फोटो दाखवण्यात येत आहे. त्याठिकाणी मुलीकडून आलेले पाहुणे दाऊदचे दूरचे नातेवाईक होते असं सांगितलं जातं. आम्हाला तेथे कोण होतं माहिती नाही. पण, आरोप झाल्यानंतर दोन वर्षांनी याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी स्पष्ट झालं की दाऊदचे कोणतेही नातेवाईक लग्नासाठी आले नव्हते. तसेच आम्हाला आमंत्रित करणाऱ्यांचे दाऊदशी दूरदूरपर्यंत संबंध नाहीत. जुने फोटे काढून आरोप केले जात आहे, असं ते म्हणाले.

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्ता प्रकरणी अडचणीत आले आहेत. त्यामुळे हे लपवण्यासाठी माझा फोटो पुन्हा बाहेर काढण्यात आला आहे. खडसेंच्या तर डोक्यात काही बिघाड झाला आहे. त्यांच्याविरोधात १६७ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहे. विरोधकांच्या पोटात दु:खतय त्यामुळे ते आरोप करताहेत, असं गिरीश महाजन म्हणाले.

आम्हाला ज्यांनी निमंत्रण दिलं होतं. त्यांचा दाऊदशी संबंध नाही. खडसे यांच्यावर कारवाई झालीये. पायात चप्पल घालायला देखील पैसे नाहीत अशी अवस्था त्यांची झालीये. माझा सत्यानाश झाला मग हा कसा वर जातोय. म्हणून ते बावचाळले आहेत. त्यामुळे जुने आरोप शोधून काढले जात आहेत, अशी टीका त्यांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT