Gopichand Padalkar Sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांचे ओबीसी प्रेम बेगडी, पडळकर यांची टीका

नामदेव कुंभार

आटपाडी - ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ओबीसींवरील प्रेम बेगडी असल्याची टिका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत एक शब्दही काढलेला नाही तेच आज मराठा आरक्षणावर भूमिका मांडू लागले आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला. आज ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘पवार कुठलेही काम हेतुशिवाय करीत नाहीत. आपला खरा हेतू कधीच दाखवत नाहीत. केंद्राने ताट वाढलंय खरे आहे. तुमचे हात पण बांधले गेलेत तेही खरे आहे. पण हे हात कुणामुळे बांधले गेले, असा सवाल त्यांनी केला. राज्यात सत्तेत असताना त्यांनी करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले आहे. २०११ चा जनगणना अहवाल आता मागत आहेत. त्यातला घोळ ते सहभागी असलेल्या मनमोहनसिंग सरकारनेच घातला आहे. मराठा आरक्षणाचे मागासलेपण सिद्ध करण्याची कोणतीही प्रक्रिया आजअखेर सुरू केलेली नाही. आजपर्यंत मराठा आरक्षणाबाबत बोलत नव्हते ते आज भूमिका मांडायला लागले आहेत. हाच बहुजनांचा प्रस्थापितांविरोधातील पहिला विजय आहे.

ओबीसी, मराठ्यांची केंद्राकडून फसवणूक - शरद पवार

पन्नास टक्क्यांची अट कायम ठेवून ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, असे म्हणणे म्हणजे शुद्ध फसवणूक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात आधीच ६५ टक्के आरक्षण आहे. यामध्ये तुम्ही आणखी भर घालत आरक्षण द्या म्हटले तर देणार कुठून. कारण आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांच्या मर्यादेची अट कायम आहे. ही अट कायम ठेवून या घटकांना आम्ही दिले, असे सांगणे ही शुद्ध फसवणूक आहे. उलट यामधून काहीही मिळणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूस आंब्यावर गुजरातचा दावा, कोकणवासियांची चिंता वाढली; मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

IND vs SA, 3rd ODI: अखेर दोन वर्षांनी भारतीय संघाने जिंकला टॉस! निर्णायक सामन्यासाठी Playing XI मध्ये काय झालेत बदल?

Latest Marathi News Live Update : ईश्वरपूर मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या घरासमोर करणी-भानामतीचा प्रकार

Kolhapur Crime : इचलकरंजीच्या तरूणाचे अपहरण करून निर्घृण खून; कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवरील ओढ्यात फेकला मृतदेह, खुनाचं कारण काय?

Thane Traffic: ठाणे घोडबंदर मार्ग २४ तास बंद, कधी अन् का? जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT