Sharad Pawar sakal media
महाराष्ट्र बातम्या

'आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण..', शरद पवारांना पडळकरांचं प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

पुणे मेट्रोच्या उद्घाटनावरुन राजकारण तापले असून राष्ट्रवादी कॉग्रेस - भाजप नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यातच शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टिकेला भाजप (BJP) चे नेते आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रत्युतर दिलं आहे. पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विट करत दिली आहे.

पडळकर यांनी आज एक दोन मिनिटांचा एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये बोलताना पडळकर म्हणाले की, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं भाषण ऐकून मी अवाक झालो, एकीकडे ते आपल्या वयाच्या मानाची अपेक्षा ठेवतात पण वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. पुणे मेट्रो उद्घाटनाचं निमंत्रण न मिळाल्याने हताश होऊन ते बोलले असतील. पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकरी पुत्र सदाभाऊ खोत की वंचितांचा पुत्र राम सातपुते यांच्यासारख्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या मुख्या प्रवाहात पुढे आणले यामुळेच महाराष्ट्रातील प्रस्थापितांचा तिळपापड होतोय, म्हणूनच आमचे हितचिंतक देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत खुपतायत असे ते म्हणाले.

पडळकरांनी पुढे बोलताना सांगितले की, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ असे एकूण १६१ आमदार महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा सत्तेत आणण्यासाठी निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात पावसात भिजूनसुध्दा फक्त ५४ आमदार निवडून आले त्यामुळं जनतेन तुम्हाला निवडून दिलं अशा थापा मारणं आता बंद करा. आपण म्हणता पुन्हा येऊ देणार नाही, पण तुमता पक्ष स्थापण झाल्यापासून राष्ट्रवादीचा नेता मु्ख्यमंत्री म्हणून बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती बाजू घेणं हे खूप सोप आहे पण लोकहितासाठी झगडणं महाकठिण आहे असं पडळकर म्हणाले.

शरद पवार काय म्हणले..

संकटावेळी राजकारण आणायचं नाही. पण, काहींना राजकारण आणल्याशिवाय चैनच पडत नाही. काहींची सत्ता गेली तेव्हा त्यांची झोप गेली. निवडणूक, मतमोजणी, निकाल लागायचा बाकी असतानाच काहीतरी सांगायचे म्हणून काहींनी ‘मी परत येणार, येणार’ असा नारा दिला. पण आम्ही येऊ देतो काय? लोकांनी काय ठरवायचे ते ठरविले आणि महाविकास आघाडी यशस्वी झाली, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला लगावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT