CM Uddhav Thackeray eSakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : बाळासाहेब म्हणत असतील माझ्याच लेकाने….;पाटण्यातील गेलेल्या ठाकरेंवर भाजपचा हल्ला

रोहित कणसे

बिहारची राजधानी पाटणा येथे देशातील विरोधकांची बैठक होत आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपला रोखण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे देखील पोहचले आहेत. दरम्यान या बैठकीवरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी उद्धव ठाकरेंवर बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगत हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे आज पाटण्याला पोहोचले आहेत. हिंदु शिवसेना हे हिंदुविषयी बोलणारे उद्धव ठाकरे यांचे वडील 'हिंदुसम्राट' बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की ते शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही. जर काँग्रेसशी हातमिळवणी करावी लागली तर मी माझं दुकान बंद करेन. आज बाळासाहेब ठाकरे विचार करत असतील की दुसरं कोणी नाही तर माझ्याचं मुलाने शिवसेनेचे दुकान बंद केलं, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, ओडिशातील कालाहांडी येथे

विरोधकांच्या या बैठकीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, पाटण्याला होत असलेली बैठक मोदी हटाव नाहीये तर परिवार बचाओ बैठक आहे. सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आले आहेत. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे कशी सत्ता राहील याकरिता सगळे एकत्र आले आहेत. कारण यांच्यासाठी राज्य चालवणं हा धंदा आहे.

तर भाजप आणि मोदी यांच्यासाठी ती सेवा आहे. म्हणून येणाऱ्या काळात २०१९ ला यांनी एकत्र येवून पाहिलं, पण जनता मोदींच्या पाठिशी आहे. असे कितीही मेळावे केले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा टोला..

सातत्याने मेहबुबा मुफ्तींच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आता मेहबुबा मुफ्तींसोबत चाललेच नाहीत तर त्यांच्या बाजूला बसलेत. सत्तेकरिता आणि परिवार वाचवण्यासाठी सर्व तडजोडी करायला तयार आहेत पण याचा कुठलाही परिणाम होईल असं वाटत नाही असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT