Nawab-Malik-NCP sakal media
महाराष्ट्र बातम्या

''नवाब मलिक NCB च्या मोहिमेत अडथळा आणण्याचे काम करतात''

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक (NCP Minister Nawab Malik) यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांबाबत खुलासे करून जावयावर खोटे आरोप केले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता भाजपने त्यांच्या टीका केली आहे. नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या प्रश्नावर काही बोलत नाही. मात्र, एनसीबीच्या कारवाईवर अविश्वास दाखवत आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी हर्बल तंबाखूचे समर्थन करणे दुर्दैवी आहे, असे भाजपचे नेते केशव उपाध्याय (BJP leader Keshav Upadhyay) म्हणाले.

''नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी पक्ष समोर आला आहे. शरद पवार देखील अंमली पदार्थाच्या री ओढत आहेत. हर्बल तंबाखूचे समर्थन करणे दुर्दैवी आहे. अंमली पदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणात सापडत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. राज्यातील इतर प्रश्नावर राष्ट्रवादी बोलत नाही. पण, हर्बल तंबाखूचे समर्थन करतेय'', असा आरोप केशव उपाध्याय यांनी केला आहे.

''अंमली पदार्थ सापडले तरी हर्बल तंबाखू असल्याचे दाखविले जात आहे. तंबाखूचे दुष्परिणाम माहिती असताना देखील पवार त्याचे समर्थन करत आहेत. त्यांना या वनस्पतींची माहिती असायला पाहिजे. एनसीबीच्या मोहिमेत संकट आणण्याचे काम नवाब मलिक करत आहेत. पडद्यामागची वसुली समोर आल्याने तिन्ही पक्षांचा थयाथयाट सुरू आहे. या सरकारमधील मंत्र्यांचा भ्रष्टाचार समोर येत आहे. त्यामुळे अपयष झाकण्यासाठी तपास यंत्रणेबाबत बोललं जातंय'', असेही उपाध्याय म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: सरकारी शाळांसाठी किती निधी? किती पदे रिक्त? अभिजीत दीपकेंनी शिक्षण मंत्र्यांना विचारले ६ सवाल, माहिती देण्याचे आवाहन

रेल्वेच्या चादरी घेऊन बाजारात फिरले अन् कॅमेऱ्यात कैद झाले; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

IND vs SL 2nd Test: ध्रुव जुरेलची शतकी खेळी! भारताची पाचशे धावांच्या दिशेने वाटचाल; हार्दिक पांड्यानंतर असा पराक्रम करणारा पहिला

Marathi News Live Updates : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी रशियातील मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली

झी मराठीवर येतेय नवी मालिका ‘धाकट्या सूनबाई’! प्रेमाची नवी गोष्ट लवकरच, कोण आहे नायिका?

SCROLL FOR NEXT