Kirit-Somaiya  sakal
महाराष्ट्र बातम्या

विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे...; किरीट सोमय्यांचे ट्वीट चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीतील भाजपच्या विजयानंतर आज पुन्हा विधान परिषदेची निवडणूकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर भाजपचे नेत किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे ठाकरे सरकारचा निकाल असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे यांचा माफिया सरकारचे दिवस भरले आहेत असे देखील सोमय्या म्हणालेत.

दरम्यान दोन तासांच्या विलंबानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचे पाच पैकी 4 उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 2 शिवसेनेचे (Shivsena) 2 आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची रणनीती राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील यशस्वी ठरली आहे.

हिल्या फेरीच्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे, हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. तसेच काँग्रसेच पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे देखील विजयी झाले आहेत. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्या चुरशीची लढत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि कठोर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

''हिंदू समाजाने संयम राखावा, कोणत्याही.... ''; राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रीय संवयसेवक संघानं स्पष्टच सांगितलं!

Latest Marathi News Live Update : सिया गोयल आणि चेतन चौधरी ला पोलिसांनी न्यायालयात केलं हजर

Pune Crime: कुंजीरवाडीत एफडीएची धडक छापा; ६६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दुकान सीलबंद, विक्रेता व पुरवठादारावर गुन्हा

Success Story: रोज 3 तास ट्रॅफिकमध्ये अडकायचा! आज वडापाव विकून कमावतो लाखो रुपये; मराठी तरुणाने कसा उभारला व्यवसाय?

SCROLL FOR NEXT