Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: "शरद पवारांसाठी डोके आपटणारे भाजप प्रवेशासाठी उभे होते"

अजित पवार भाजपच्या सीमारेषेवर आहेत? राणेंचा पत्रकारांना प्रतिप्रश्‍न

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ डोके आपटणारे काही दिवसांपूर्वी भाजपच्या दारात प्रवेशासाठी उभे होते. मी त्याला ढोंग म्हणणार नाही, असा खोचक टोला सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवेढा येथे पत्रकारांशी बोलताना लागावत, शरद पवारांचा पक्षीय राजकारणातून विश्रांती घेण्याचा निर्णय वैयक्तिक असल्याचेही ते म्हणाले.

मंगळवेढा येथे शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी उद्योग मेळाव्याच्या समारोपानंतर केंद्रीय मंत्री राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, बारसू प्रकल्प झाला पाहिजे. जर उद्धव ठाकरे जाणार असतील तर मीही बारसूला जाणार आहे,. तो प्रकल्प हवा आहे. दीड लाख कोटींच्या गुंतवणुकीतून अनेक छोट्या- मोठ्या प्रकल्पांतून बारसू होणार असून, त्यामध्ये तरुण-तरुणींना रोजगार मिळणार आहे. हॉस्पिटल, कॉलेज आदी सुविधा त्यातून दिल्या जाणार आहेत. असे अनेक प्रकल्प सुरू होतात, उद्धव ठाकरे यांचे काय जाते. सगळेच नको म्हणतो. ती मंडळी सध्या बेकार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात ४४ साखर कारखाने असून, जास्तीचे पैसे देण्यासाठी हात आखडता का घेतला जातो, या विषयावर त्यांना विचारले असता, जास्तीचे पैसे मिळावेत यासाठी राज्य व केंद्रातून प्रयत्न करणार असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले. मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात गेलो तेव्हा माहिती घेतली असता अडीच वर्षात उद्धव ठाकरे फक्त अडीच तास मंत्रालयात हजर होते, अशी माहिती मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ आता ढिली होणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजप प्रवेश करणार का, या प्रश्‍नावर त्यांनी मला माहीत नसल्याचे तर विरोधी पक्षनेते अजित पवार हे सीमारेषेवर असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेच्या सचिवा प्रियदर्शनी कदम- महाडिक, पवन महाडिक, शशिकांत चव्हाण, दीपक चंदनशिवे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT