ashish shelar uddhav thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेला राग आला नाही, तर त्यांनी तमाशा केला - आशिष शेलार

अज्ञान उघडं पडल्यावर त्यावरून लक्ष बाजूला करण्यासाठी शिवसेनेने थयथयाट केला

सुमित सावंत

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान, त्यानंतर त्यांना झालेली अटक-सुटका आणि आता पुन्हा सुरु झालेली जनआशीर्वाद यात्रा (janashirwad yatra) यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं ढवळून निघालं आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा सामना जोरात सुरु आहे. दोन्ही बाजुंकडून परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

राणेंची जनआशीर्वाद यात्रा आता त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे सिंधुदुर्गात सुरु आहे. नारायण राणेंसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा नेते आशिष शेलार सोबत आहेत. आशिष शेलार यांनी त्यांच्या भाषणात, यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ आणि केवळ भाजपचं कमळ फुलेलं असं म्हटलं आहे. "कोकणात दिवाळीच वातावरण पाहायला मिळालं. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखणार" अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

"आम्हाला अडवण्याचा प्रयत्न झाला आहे. मांजर तर आडवी येणारच. शिवसेनेला राग आला नाही तर त्यांनी तमाशा केला" असे शेलार म्हणाले. "राणे साहेबांनी अज्ञान उघड केलं म्हणून त्यांना राग आला. अज्ञान उघडं पडल्यावर त्यावरून लक्ष बाजूला करण्यासाठी शिवसेनेने थयथयाट केला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोकणवासियांच्या विरोधात आहे. कोकणातल्या शिवसेनेच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी अडगळीत टाकलं आहे" असे शेलार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT