Devendra Fadanvis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: फडणवीसांच्या घरासमोरच भाजपा पदाधिकाऱ्याकडून पोलिस उपायुक्ताला धक्काबुक्की, राऊतांनी शेअर केला VIDEO

'भाजपा पदाधिकाऱ्याकडून फडणवीसांच्या घरासमोरच पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की', बातमी दाबण्यात आल्याचा ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप

अंकिता खाणे (Ankita Khane)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानबाहेर पोलीस उपायुक्तांना भाजपच्या युवा शहर प्रमुखाकडून धक्काबुक्की करण्यात आली असल्याची माहिती आहे. या धक्काबुक्कीचा व्हिडीओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर(ट्विट) शेअर केला आहे.

'हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारं आहे', असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपचे युवा शहराध्यक्ष पुष्कर पोशेट्टीव यांनी नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना धक्काबुक्की केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. उपायुक्त पदाच्या पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की कशी केली जाऊ शकते? याबाबतच्या चर्चा आता सुरू आहेत.

या घटनेचा व्हिडीओ शेअर करत ‘एक्स’ अकाउंटवर संजय राऊत म्हणाले, "हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे. मुक्काम पोस्ट, नागपूर. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे देवगिरी निवासस्थान. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपा युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्काबुक्की केली. खाकी वर्दीच्या कॉलरला हात घातला. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता."

दरम्यान या प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिला आहे. यावेळी ही बातमी दाबण्याचा प्रयत्न गृहमंत्रालयाकडून करण्यात आला असं अंधारे यांनी म्हटलं आहे. "भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी पुष्कर पोशेट्टीव पोलीस उपायुक्तांच्या अंगावर गेले आहेत. ही बातमी दाबण्याचा प्रयत्न गृहमंत्रालयाकडून करण्यात आला. गृहमंत्र्यांच्या घरासमोरच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून ही गुंडगिरी होत असेल, तर सर्व सामान्य नागरिकांवर काय अत्याचार करण्यात येत असतील, याचं उदाहरण म्हणजे ही घटना आहे," अशी खोचक टीका सुषमा अंधारेंनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT