Ajit Pawar and Chandrakant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'अजितदादा आलेत का? की आज पुन्हा...', चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील कालवा समितीची बैठक पार पडत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील कालवा समितीची बैठक पार पडत आहे. पुण्यात पाणीकपात होणार का हे या बैठकीत ठरणार आहे. पुणे येथील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे ही या बैठकीला उपस्थित रहाणार होते.

या बैठकीआधी चंद्रकांत पाटील सर्किट हाऊस ठिकाणी पोहोचले. गाडीतून उतरताच त्यांनी कार्यकर्त्यांना अजित दादा आले आहेत का? की आज देखील गायब झाले? असा खोचक टोला लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. कधी ते भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली तर कधी ते भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा सुरू होते. पुणे शहरानंतर अजित पवार यांच्या सासूरवाडीतही महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा असं लिहिलेली बॅनर्स झळकले आहेत.

दरम्यान या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आज पुण्यात दोन मोठ्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली. या भेटीपूर्वी अजितदादा आलेत का? की आज पुन्हा गायब झाले? असा प्रश्न विचारला गेला. यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली.

बुधवारी पुणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित राहणार होते. मग या बैठकीच्या काही काळ आधी चंद्रकांत पाटील सर्किट हाऊस ठिकाणी पोहचले. त्यांनी गाडीतून उतरताच प्रश्न विचारला. 'अजितदादा आले आहेत का? की आज देखील गायब झाले?' त्यांच्या या प्रश्नामुळे कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्यात चर्चांना सुरुवात झाली.

या बैठकीसाठी अजित पवार गैरहजर

तर या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे वेळापत्रक बदलल्यामुळे अजित पवार त्यांच्या पुढील कामासाठी रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT