chitra wagh chakankar google
महाराष्ट्र बातम्या

'दरेकर राष्ट्रवादीबद्दल चुकीचं बोलले नाही, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय'

सकाळ डिजिटल टीम

पुणे : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (council opposition leader pravin darekar) यांनी शिरूर येथे बोलताना राष्ट्रवादीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रमुख रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी केला. त्यांनी प्रवीण दरेकरांविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader chitra wagh) यांनी राष्ट्रवादी आणि पुणे पोलिसांवर निशाणा साधला आहे.

''राष्ट्रवादी हा प्रस्थापितांचा पक्ष आहे. राष्ट्रवादी हा साखरसम्राटांचा पक्ष आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, असे दरेकर बोलले होते. मात्र, ते काही चुकीचे बोलले नाही. रंगलेले गाल हे बाईचेच का वाटावे? ज्या गोष्टीला काही शेंडा नाही, बुडखा नाही. त्याचा फक्त बागुलबुवा करून ठेवलेला आहे. पुणेकरांची मराठी चांगली आहे. मग त्यांनी वाक्याचे अनर्थ का काढावे?'' असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

दरेकरांच्या भाषणामध्ये बाईचा 'ब' सुद्धा नाही. सुरेखा पुणेकरांचा तर उल्लेख पण त्यांनी केला नव्हता. पुणे पोलिसांनी दरेकरांचे भाषण पूर्ण न ऐकताच गुन्हा दाखल केला नाही. बलात्काराच्या इतक्या घटना होतात. मग त्याकडे लक्ष का दिलं जात नाही? खेचून ताणून आणलेला हा निव्वळ बावळटपणा आहे. दुसरं काहीही नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

रुपाली चाकणकरांचे आरोप काय?

"विधापरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये खूप खराब विधान केलं. समाजामध्ये जाहीरसभेत बोलताना महिलांना लज्जा निर्माण होईल असं विधान दरेकरांनी केलं. महिलांनी त्यांच्याबद्दलच आपला रोष व्यक्त केला. प्रवीण दरेकरांनी त्यावर माफी मागणं अपेक्षित होतं. त्यावर त्यांनी या गोष्टीला आपण इतकं महत्व देत नाही असं सांगितलं. यातून त्यांचा उमर्टपणा, वैचारिक दारिद्रय दिसतं. म्हणून मी त्यांच्याविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली. न्याय मिळेल असा मला विश्वास आहे" असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

Nagpur News: खोलीत सापडला ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह; नारातील धक्कादायक घटना, परिसरात खळबळ

"माझं करिअर सासरच्या लोकांमुळे घडलं" सासू-सासऱ्यांबद्दल मराठी अभिनेत्री व्यक्त; 26 व्या झालेलं नवऱ्याचं निधन

Latest Marathi News Live Update : कल्याणच्या द्वारली पाड्यात गुरचरण जमिनीवर अतिक्रमण, म्हैस घेऊन केडीएमसी आय प्रभाग कार्यालयात नागरिकांचे आंदोलन

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT