Chandrashekhar Bawankule  eSakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: 'पराभवाची जबाबदारी....'; फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीनंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

Devendra Fadanvis Resign Statement: सरकारच्या बाहेर जाऊन नाही तर सरकारच्या मध्येच राहून त्यांनी काम करावं अशी आमची इच्छा आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी आपली इच्छा व्यक्त केली. पण, आम्हाला ते सरकारमध्ये आणि संघटनेमध्ये देखील हवे आहेत. त्यांनी दु:खातून ही भावना व्यक्त केली आहे. केंद्रासोबत मी याबाबत बोलणार आहेच. सरकारच्या बाहेर जाऊन नाही तर सरकारच्या मध्येच राहून त्यांनी काम करावं अशी आमची इच्छा आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

लोकसभेच्या राज्यातील कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानंतर फडणवीस पत्रकार परिषदेतून बाहेर पडले. भाजप नेत्यांनी फडणवीसांशी चर्चा करून आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करुन लगेच दुसरी पत्रकार परिषद घेतली. यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांची भूमिका स्पष्ट केली.

जागा कमी आल्या आहेत. पण, आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून पुढेही काम करत राहू. ते सरकारमध्ये राहून चांगलं काम करु शकतात. केंद्रासोबत मी याबाबत बोलणार आहे. कधीकधी यश मिळत नाही. पण, अपयशाची जबाबदारी फडणवीस यांची एकट्याची नाही. आम्ही काम केलं होतं, पण आम्ही पास झालो नाही. आम्ही कमी पडलो. पण, आम्ही सोबत मिळून काम करणार आहोत. राज्यातील सर्व नेत्यांनी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, अस बावनकुळे म्हणाले.

आम्ही पराभवाचं चिंतन करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात लढताना पुढच्या विधानसभेसाठी आम्ही पुढील पंधरा दिवसात एक रोडमॅप तयार करणार आहोत. फडणवीस यांनी पूर्णवेळ विधानसभेसाठी काम करण्यासाठी जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केलीये. पण, कोअर समितीच्या सदस्यांचं म्हणणं आहे, त्यांनी सरकारमधून बाहेर राहुन काम करण्याची गरज नाही. त्यांना आम्ही विनंती केली आहे की, सरकार आणि संघटनेमध्ये समन्वय ठेवून त्यांनी काम करावं, असं बावनकुळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

SCROLL FOR NEXT