Rashmi Thackery  
महाराष्ट्र बातम्या

मुंबई: रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट, भाजपा नेता ताब्यात

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणानं (Maharashtra Poltics) एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची मर्यादा ओलांडल्याचे दिसते आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणानं (Maharashtra Poltics) एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची मर्यादा ओलांडल्याचे दिसते आहे. सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधी पक्षाकडून होत असल्याचे दिसून आले आहे. आता मात्र त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackery) यांच्यावरही आक्षेपार्ह प्रतिक्रिया सोशल मीडियातून समोर आल्या आहेत. त्याप्रकरणी भाजपच्या एका नेत्याला आयटी सेलनं अटक देखील केली आहे. त्यानं ट्विटवर रश्मी ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख राबरी देवी असा केला होता. या ट्विटची काही वेळेपासून जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

ते वक्तव्य केल्याचे कळताच त्याचे मोठ्या प्रमाणावर पडसाद राजकीय वर्तुळामध्ये उमटल्याचे दिसून आले आहे. त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. भाजपला सत्ता न मिळाल्यानं पोटशुळ उठल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी दिली आहे. काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष यांच्यातील विसंवाद चव्हट्यावर येताना दिसत आहे. सोशल मीडियातून देखील तो वाद लोकांसमोर आला आहे. त्यावरुन त्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया देत विरोधी पक्षाच्या याप्रकारच्या वक्तव्यावर नाराजीही व्यक्त केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती. त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

SCROLL FOR NEXT