Kirit Somaiya  e sakal
महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya News : भाजप नेते किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी...

रोहित कणसे

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सोमय्या यांनी खाजगी वृत्तवाहिनी आणि अनिल थत्ते यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भा. दं. वि. ५०० (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ई) आणि ६७ (अ) अंतर्गत या प्रमाणात गुन्हा नोंद करण्यात आला. मंगळवारी सोमय्या यांचा जबाब देखील नोंदवण्यात आला होता.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने तपासादरम्यान जे काही आढळून आले त्या आधारे हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा केला आहे. यात कोणत्याही प्रकारे छेडछाड किंवा मॉर्फ केलेले नसल्याचे गुन्हे शाखेने सांगितले होते.

विशेष म्हणजे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण व्हिडिओचे बारकाईने विश्लेषण केले आणि व्हिडिओ मॉर्फ केलेला नसल्याचे आढळून आले होते. हा व्हिडीओ खरा निघाला असताना हा व्हिडीओ कोणी आणि कोणत्या उद्देशाने व्हायरल केला याचा तपास पोलीसांकडून करण्यात आला.

एका मराठी वृत्तवाहिनीने भाजप नेते सोमय्या यांची आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला. मराठी वृत्तवाहिनीनेही त्यांच्याकडे असेच आणखी व्हिडिओ असल्याचा दावा केला होता. गुन्हे शाखेने त्या वृत्तवाहिनीला पत्र लिहून त्या व्हिडिओंची मागणी केली होती, जेणेकरून तपास करता येईल. दरम्यान विधानसभा पावसाळी अधिवेशनादरम्यान या प्रकरणी मोठा गदारोळ झाल्याचे पाहयला मिळाले. ज्यामध्ये मुख्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र विधानसभेत आठ तासांचा पेन ड्राइव्ह सादर केला, त्यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT