Mohit Kamboj criticism on sanjay raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

किरीट सोमय्यांनी राऊतांची झोप उडवली; भाजप नेत्याचे टीकास्त्र

संजय राऊत किरीट सोमय्यांना घाबरतात- मोहित कंबोज

सकाळ डिजिटल टीम

भाजप (BJP) आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगले आहे. नेतेमंडळी एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. मागील काळात कलेले काही घोटाळे आणि सध्या सुरु असलेला भ्रष्टाचार अशा काही कळीच्या मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. हे आरोप करत असताना शाब्दिक चकमक देखील होत आहे. भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करत व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

मोहित कंबोज म्हणतात, संजय राऊत किरीट सोमय्या (kirit somaiya) याच्यांवर आधी आरोप करतात. या आरोप संदर्भात माध्यमे जेव्हा संजय राऊत यांना प्रश्न विचारतात तर म्हणतात कोण आहेत किरीट सोमय्या मला माहीत नाही. पुन्हा ते ट्विट करुन सोमय्या यांच्यावर आरोप करतात. त्यांच्या केलेल्या आरोपवर सोमय्या जेव्हा प्रत्युत्तर देतात तेव्हा राऊत अपशब्द वापरतात. यावरून असे लक्षात येते की राऊतांच्या स्वप्नात सोमय्या येत आहेत. ते आता घाबरले आहेत. सोमय्यांनी राऊतांची झोप उडवली आहे अशी टीका मोहित कंबोज यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी बारामतीची हर्बल वनस्पती पिली आहे. यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे. ही भिती चांगली आहे. संजय राऊत सोमय्या यांना घाबरले आहेत. अजून पुढे बघा काय- काय होतयं ते असा टोला मोहित कंबोज यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांना महिलेनं झापलं? आता तिनेच सांगितलं सत्य; म्हणाली- माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून...

Nashik News: धर्मांतर व बलात्कार प्रकरण गंभीर; फरार निदा खानचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला, नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय!

Sangli Yerala River Drowning : येरळा नदीत ८ जण बुडाले, एका तरुणीचा मृत्यू; पोहण्याचा मोह ठरला जिवघेणा

Mumbai Pune Expressway: दोन्ही मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुले; ‘मिसिंग लिंक’ची ‘मुंबई लेन’ सकाळी बंद अन् दुपारी दिलासा, वाहनचालकांना मनस्ताप!

Perfect Sunday Breakfast: झटपट बनवा कुरकुरीत आणि हेल्दी 'रवा टोस्ट', रविवारच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT