Mohit Kamboj News esakal
महाराष्ट्र बातम्या

Mohit Kamboj: उद्धव ठाकरे-भाजप व्हिडीओ वॉर! माझ्याकडे ११० व्हिडीओ तयार, म्हणत कंबोज यांचे थेट आव्हान

भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना चॅलेंज केलं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला लक्ष करत उद्धव ठाकरे यांना चॅलेंज केलं आहे. मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरती एक फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' म्हणणारे कोव्हिड काळात कोण कोण कुठे दारू पिऊन कसली जबाबदारी निभावत होते, याचा एक व्हिडीओ ट्रेलर मी दाखवला आहे. अजून माझ्याकडे 110 व्हिडीओ बाकी आहेत. तयार असाल तर दररोज एक सँपल द्यायला सुरुवात करतो असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

काय आहे ट्विटमद्धे

भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. माझे कुटुंब माझी जवाबदारी म्हणणारे कोरोना काळात कोण कोण कुठे दारू पिऊन कसली जबाबदारी निभावत होते, याचा एक व्हिडीओ ट्रेलर मी दाखवला आहे. अजून माझ्याकडे 110 व्हिडीओ बाकी आहेत.(Latest Marathi News)

बोरिवलीच्या नॅशनल पार्कपासून ते बॉलिवूड दलालांच्या पार्टीत काय झालं त्याचे सगळे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. इतिहास साक्ष आहे, की माझा स्ट्राईक रेट 100 टक्के आहे. माझी आजवरची तारीख कधीही चुकली नसल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी या ट्विटमद्धे हातात पेन ड्राईव्ह घेतलेला एक फोटो शेअर केला आहे.(Latest Marathi News)

मी यावर जास्त काही बोलत नाही कारण काही लोकांनी मला थांबवलं आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना माझ खुलं आव्हान आहे की, ते जर तयार असतील तर दररोज एक सँपल द्यायला सुरू करतो असंही कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. आता मोहित कंबोज यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT