Mohit Kumbhoj google
महाराष्ट्र बातम्या

कर्ज बुडवल्याप्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल

याप्रकरणी मोहित कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी मोहित कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय

मागील काही दिवसांपासून मोहित कुंबोज यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर येत आहे. आर्थिक गुन्हे शाखा अर्थात EOW ने मुंबईत मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या कंपनीने तब्बल ५२ कोटी रुपयांचे कर्ज बुजवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०११ ते २०१५ या कालावधीत मोहित कंबोज यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण हे पैसे ज्या कारणासाठी घेतले होते, त्याऐवजी इतरत्र वळवण्यात आले. नंतरच्या काळात मोहित कंबोज यांच्या कंपनीने हे कर्ज बुडवले होते. त्यामुळे याप्रकरणी मोहित कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता कारवाईचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कंबोज यांच्याविरोधातील या गुन्ह्यामुळे हा भाजपासाठी मोठा धक्काही मानला जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या काही काळात मोहित कंबोज यांनी नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केले होते. किरीट सोमय्या यांच्या बरोबरीने कंबोज हे महाविकास आघाडीवर हल्ला चढवण्यात आघाडीवर होते. मध्यंतरी मोहित कंबोज यांनी हनुमान चालीसा वादातही उडी घेतली होती. यावेळी त्यांनी मशिदींसमोर लावण्यासाठी मोठ्याप्रमाणावर भोंग्यांचे वाटप केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT