Amol Kolhe Esakal
महाराष्ट्र बातम्या

Amol Kolhe : "दाढी काढली तर अमोल कोल्हेला कोणी ओळखणार पण नाही"

या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

भाजपा आमदार नितेश राणे सध्या वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी विकासासंदर्भात बोलत का नाहीत? काँग्रेसचा एकही नेता विकासासंदर्भात बोलतो का? असा सवाल करत असतानाच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल कोल्हे यांच्यावर नितेश राणेंनी हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. बोलताना ते म्हणाले की, 2024 मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू. इतकंच नाही तर, अमोल कोल्हे कुठेही भेटू दे त्याला दाखवतोच, अशा शब्दात राणेंनी हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

तर पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, 'कुठला तो अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करीत नाही. नावासाठी खासदार झाला आहे. त्याला 2014 मध्ये आपटून टाकू. एवढं काही मोठा विषय नाही. दाढी काढली तर कोणी ओळखणार पण नाही. तो सिरीयल पुरताच आहे, अशा खोचक शब्दात नितेश राणे यांनी टीका केली आहे.

तर भारत जोडो यात्रेमधील राहुल गांधी यांची कोणतेही पत्रकार परिषद बघा. फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायची. हिंदू धर्मावर टीका करायची. फक्त आमच्या साधू संतांवर टीका करायची. वीर सावरकरांवर टीका करायची. बाकी काहीच नाही, असं म्हणत राणेंनी राहुल गांधीनाही त्यांनी लक्ष्य केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

SCROLL FOR NEXT