pankaja munde direct taunt to devendra fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

''मला आलेल्या ऑफरकडे सीरियसली बघितलं नाही, परंतु बघणार नाही, असं नाही'' पंकजांच्या विधानाने खळबळ

संतोष कानडे

बीडः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज बीडमध्ये केलेलं विधान लक्षवेधी आहे. मागच्या काही काळापासून त्या भाजपमध्ये नाराज असल्याचं बोललं जातं. त्यातच त्यांना इतर पक्षांकडून ऑफर आलेल्या आहेत.

बीडमधील कार्यक्रमामध्ये बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं, मी सांगितलं होतं गळ्यात फुलांचा हार घालणार नाही.

त्या पुढे म्हणाल्या. आपल्याला दूध पोळलेलं आहे. त्यामुळे ताक फुंकून पिण्याची वेळ आलेली आहे. २०२४ इतिहास घडवणारं म्हणजेच इतिहास बदलवणारं वर्ष आहे. तुमच्या सगळ्यांची निःस्वार्थ मला पाहिजे आहे.

त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलतांना म्हणाले की, २०१९मध्ये बीडमध्ये काही अपघात झाले. आता २०२४मध्ये तसं होणार नाहीत. पंकजाताईंच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवू, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

कार्यक्रमापूर्वी 'एबीपी माझा'शी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, सर्व पक्ष माझ्याविषयी सकारात्मक बोलत आहेत. माझ्याविषयी कोणी सकारात्मक बोलत असेल तर कोणाविषयी मी नाकारात्मक बोलण्याचा प्रश्न येत नाही. मला आलेल्या ऑफरवर मी सध्या सिरीयसली बघितले नाही मात्र मी बघणार नाही असे नाही. कारण कोणत्याही व्यक्तीला सिरीयसली न घेणं हा त्यांचा अपमान असतो.

पंकजा मुंडे यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. कारण मागच्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. २०१९ मध्ये परळीमध्ये झालेल्या पराभवाबद्दल पंकजा मुंडेंनी विरोधी उमेदवाराला खुराक पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर खासदार प्रितम मुंडे यांच्याऐवजी भागवत कराड यांना केंद्रात राज्यमंत्रीपद दिल्याने पंकजा मुंडेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांचं आजचं विधान लक्षवेधी ठरत आहे.

पंकजा मुंडे येत्या काही काळात पक्षांतर करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांना राष्ट्रवादी, बीआरएस, एमआयएम या पक्षांच्या ऑफर आल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय त्यांचे कार्यकर्ते पक्ष स्थापन करण्याविषयी मागणी करत आहेत. पंकजा मुंडे काय निर्णय घेतात, हे लवकरच कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT