Pankaja Munde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde: "… मला महाराष्ट्राची काळजी वाटते आहे", पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत

पंकजा मुंडे यांनी सध्या सुरू असणाऱ्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशातच महाराष्ट्रात सत्ताबदल होणार असून राजकीय भूकंपांची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी फुटणार आणि अजित पवार ४० आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान या संपूर्ण राजकीय पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. इतके राजकीय भूकंप झाले तर मला महाराष्ट्राची काळजी वाटते आहे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या की, “मला इतके राजकीय भूकंप झाले तर मला टेन्शन येतं. माझा महाराष्ट्र कसा राहिल? याचं मला टेन्शन येतं. महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल याचंही टेन्शन येतं. मला या सगळ्याचे काही संकेत असण्याचा काही भाग नाही. कारण राज्यातले नेते याबाबत निर्णय घेतील. भाजपाला अतिरिक्त नेत्यांची गरज आहे का? लोकांची गरज आहे का? या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मी नाही” असंही पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

तर “माझ्या पंधरा वर्षांच्या राजकारणात मी कधीही कुणावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. भूकंप विरहित पक्ष बांधणीची गरज आहे. मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे हे आमच्या हातात नाही. २०२४ च्या निवडणुकीत ते जनता ठरवणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. तर लोकांचा विश्वास जिंकून भाजपाने निवडणुका जिंकल्या आहेत. यापुढेही तसंच होईल” असा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

'परळी कृषी उत्पन्न बाजार समितीत माझी लढाई आहे. दोघेही मल्ल मोठ्या शक्तीचे आहेत. मात्र प्रवृत्ती वेगळी आहे', असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपले भाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी मात्र या दोघांनी एकमेकांचं कौतुक केलं होतं. एका कार्यक्रमादरम्यान ते एकाच मंचावर आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT