Pravin Darekar vs Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

'शरद पवारांनी आश्वासन पाळलं नाही म्हणून कर्मचारी आक्रमक'

सकाळ डिजिटल टीम

सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना गेली पाच महिने दाबण्याचा प्रयत्न केलाय.

मुंबई : एसटी महामंडळाचं (ST Workers) राज्य शासनात विलीनीकरण करावं, ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारनं अमान्य केल्यानं आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) या निवासस्थानी धडक दिली. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. त्यामुळं या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

दरेकर म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना गेली पाच महिने दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं ही परिस्थिती उद्भवलीय. लढू किंवा मरू या स्थितीत कर्मचारी असल्यानं कर्मचारी आक्रमक झालेत. या सगळ्या परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे. शरद पवारांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत आश्वासन दिलं होतं. मात्र, ते आश्वासन पाळलं गेलं नसल्यानं एसटी कर्मचारी पवार साहेब यांच्या घरी गेले असतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

ते पुढं म्हणाले, 120 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही सरकारला गांभीर्य नाही, विषय कोर्टात असताना कठोर कारवाईची भाषा केली, हा मग्रूरपणामुळं कर्मचारी हतबल झाले. त्यामुळं कर्मचाऱ्यांसमोर पर्याय उरला नाही, म्हणून त्यांनी हातात चप्पल घेऊन शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केलं. हे सरकार दगडाच्या काळजाचं सरकार असल्याची टीका दरेकरांनी महाविकास आघाडीवर केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

SCROLL FOR NEXT