महाराष्ट्र बातम्या

Dasara melava Result: आता तरी त्यांचा न्यायदेवतेवर विश्वास वाढेल, मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार यावरून राज्यातलं राजकारण चांगलचं तापलं होतं

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली. यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेला दसरा मेळावा कोण, घेणार यावरून चांगलाच वाद रंगला. शिवसेना आणि शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेत शिवाजी पार्कसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही गटांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने यावर दसरा मेळाव्यावर सुनावणी करत शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. दसरा मेळाव्याचा निकाल शिवसेनेच्या बाजुने लागला, यावरून मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधाला आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला दसरा मेळाव्याच्या निकालावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दसरा मेळाव्याचा निकाल शिवसेनेच्या बाजुने लागला. उच्च न्यायालयाने शिवसेनेचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. काही नेत्यांकडून कायमच न्यायालयाच्या भूमिकेवर संशय घेतला जातो. मात्र यावेळी निकाल त्यांच्या बाजुने लागला आहे. यामुळे आता तरी त्यांचा न्यायालयावरील विश्वास वाढेल असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार यावरून राज्यातलं राजकारण चांगलचं तापलं होतं. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झालं आहे. यामुळे शिवसैनिकांमद्धे जल्लोष पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT