uddhav thackeray and eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : शिवसेना एकट्या उद्धव ठाकरेंची नाही, त्यांच्या दोन भावाचीही आहे; भाजप नेत्याचं मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

पुणेः ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये शिवसेना पक्षावरुन कायदेशीर लढाई सुरु असतांना आज भाजप नेत्याने एक मोठं विधान केलं आहे. आमचा वडिलोपार्जित पक्ष आहे, असं सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यापुढे या विधानामुळे प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजप नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज बारामती दौऱ्यावर होते. त्यानंतर बोलतांना ते म्हणाले की, बारामतीमध्ये आज गेलो होतो. कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर काम गरजेचं असतं. बारामतीच्या कार्यकर्त्यांना तेच सांगितले. बारामतीमध्ये जे चांगलं आहे त्याचं अनुकरण केलच पाहिजे. विधान परिषदेमध्ये पराभव झाला त्याचं विश्लेषण करत आहे. कुठे चुकलं त्याच विश्लेषण करू. नियोजनात त्रुटी राहिली असल्याची शक्यता असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

कसब्यात कुणीही नाराज नाही- मुनगंटीवार

कसबामध्ये कोणी ही नाराज नाही. इच्छूक उमेदवार कामाला लागले आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, धीरज घाटे, गणेश बीडकर यांच्याशी बोललो आहे, ते कामाला लागले आहेत. उद्या माझ्या हस्ते प्रचाराला नारळ फोडल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकेंबद्दल बोलतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आपल्या देशात न्यायव्यवस्था आहे. दोन बाजू आहेत, तर्कवितर्क आहेत त्यामुळे योग्य-अयोग्य काय ते ठरेल. मुळात शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या एकट्याची नाही त्यांच्या दोन भावाची पण आहे.

आदित्य ठाकरेंबद्दल बोलतांना मुनगंटीवार म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना सुरक्षा देण्यासाठी मागणी होत आहे तर सुरक्षा देण्यासाठी एक समिती असते ती मूल्यांकन करून ठरवते. माजी सुरक्षा जेव्हा काढली होती तेव्हा अजितदादा यांनी टीका केली होती. आता हे आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षा मागत आहेत म्हणजे हा कुठला दुटप्पीपणा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

SCROLL FOR NEXT