Sudhir Mungantiwar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांचा राष्ट्रवादीला खोचक टोला, “राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी…”

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काल निवडणूक आयोगाने रद्द केला

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काल निवडणूक आयोगाने रद्द केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा धक्कादायक निकाल आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या निर्णयात धक्कादायक असं काहीच नाही. समजा परीक्षा देताना सहा पेपर द्यावे लागतात, आपण त्यापैकी दोनच पेपर दिले तर गुणपत्रिका नापसचीच येणार आहे. त्यामुळे या निकालाला धक्कादायक कसं म्हणणार असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

सुधीर मुनगंटीवार बोलताना म्हणाले की, आपल्या देशात कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी जे निकष आहेत त्यामध्ये एखाद्या पक्षाने किती राज्यांमध्ये निवडणूक लढवावी. किती राज्यांमध्ये किती टक्के मतं घ्यावी यासंबंधीचे निकष ठरलेले असतात. त्यावर ठरतं तुमच्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा द्यायचा की नाही. ही मतं घेतली नाही तर हा निर्णय धक्कादायक कसा असेल? पेपर न देता मेरिटची गुणपत्रिका येणार आहे का? त्यामुळे या निकालात धक्कादायक असं काही नाही हा प्रक्रियेचा एक भाग असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

पुढे मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्रवादीने निकष पूर्ण केले नाहीत तर राष्ट्रीय दर्जा राहणार नाही. उद्या त्यांनी कष्ट केले, मेहनत केली तर तो दर्जा त्यांना परत मिळेल. पुन्हा राज्यांमध्ये लोकप्रियता मिळाली तर निकष पूर्ण होतील, अर्थात लोकप्रियता मिळणं त्यांच्यासाठी कठीण आहे असं ते म्हणालेत.

दर्जा रद्द झाल्यानंतर जयंत पाटीलांची प्रतिक्रिया?

राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाला मिळेल याबाबत काही निकष आहेत. या निकषात प्रत्येक निवडणुकीमध्ये काही बदल होतात. आगामी काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी समाधानकारक झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो. त्यात मला फार अडचण वाटत नाही असं जयंत पाटील म्हणाले आहेत.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT