Tushar Bhosale vs Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

'प्रकाश आंबेडकरांबाबत माहित नाही, पण उद्धव ठाकरे ओवैसींच्या गळाभेटीसाठी हैद्राबादची वारी करतील'

'मी संभाजी भिडे गुरुजींच्या त्या वक्तव्याशी सहमत नाही'

सकाळ डिजिटल टीम

'मी संभाजी भिडे गुरुजींच्या त्या वक्तव्याशी सहमत नाही'

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) शिवसेनेतील जवळपास 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. आता शिंदे गट विरुध्द ठाकरे गट असा सामना पहायला मिळत आहे.

त्यातच आता भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडंच आहे, असं म्हटलंय. शिवाय, त्यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) देखील चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे शिल्लक शिवसेना‌( Shiv Sena) वाचवण्यासाठी पंढरीची वारी‌ऐवजी ओवैसींची गळाभेट घेण्यासाठी हैद्राबादची वारी करतील, असा टोला तुषार भोसलेंनी आज (गुरुवार) पंढरपुरात (Pandharpur) बोलताना लगावला. भोसले पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र येणार आहेत अशी‌ चर्चा सुरू झालीय. यावर आपलं मत काय असं तुषार भोसलेंना विचारलं असता, त्यांनी खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडंच आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात एक शिल्लक गट आहे. तो गट अनेक विषारी लोकांबरोबर युती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) यांच्याशी काय चर्चा झाली याची माहिती नाही, पण उद्धव ठाकरे हे आता पंढरीऐवजी ओवैसींची गळाभेट घेण्यासाठी हैद्राबादची वारी करतील, हे मात्र निश्चित आहे, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. दरम्यान, संभाजी भिडेंनी महिला पत्रकारास टिकली लाव असं म्हटलं, त्यावर भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT