Triple engine government maharashtra politics cm eknath shinde devendra fadanvis mumbai Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटामध्ये नाराजीनाट्य सुरू? भाजप खासदाराने व्यक्त केली खंत

भाजप खासदाराने शिंदे गटाच्या मंत्र्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात काही महिन्यांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेनेत बंड झालं. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आहेत. दोन्ही पक्षात नाराजीचे सुर अनेक वेळा ऐकू येत असतात.

दरम्यान दोन्ही पक्षातील नेत्यांकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त होत नाही. आता मात्र भाजप खासदाराने शिंदे गटाच्या मंत्र्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. यामुळे युतीतील नाराजीनाट्य समोर आलं आहे. भाजप खासदारने शिवसेनेच्या मंत्र्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्याअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमांचा धडाका पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लावला आहे. मात्र या कार्यक्रमांना जिल्ह्यातील भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन व इतर खासदारांना बोलवलं जात नाही. भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटलांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

जल जीवन मिशन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आलेली योजना आहे. या योजनेसाठी केंद्राने पैसे दिले आहेत. त्यामुळे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे खासदारांना व जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांना बोलवल्या समाजामध्ये चांगलं चित्र निर्माण होईल, जलजीवन मिशन योजनेचे कार्यक्रम सर्वसमावेशक व्हावे अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे.

शिवसेनेवर होत असलेले खोके, ओके वगैरे आरोप दूर करायचे असेल व खरोखर चांगलं काम दाखवावे लागणार आहे. कामाच्या माध्यमातून आरोप दूर करता येईल, असे उन्मेष पाटील यांनी गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT